कौटुंबिक वादातून पत्नीचा निर्घृण खून


                                
कुपवाड, (प्रमोद आथनिकर) 
    कौटुंबिक वादातून टॉवेल मध्ये दगड घालून पतीने  पत्नीला जबर  मारहाण केली होती. आज या घटनेतील
जखमी महिलेचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यु झाला.ही घटना कुपवाड येथील वाघमोडे नगर मध्ये घडली आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपसिंह गिल यांनी घटनास्थळी  भेट देऊन पाहणी केली.                         
     कुपवाड येथील  वाघमोडे नगर मध्ये रामचंद्र विठोबा हाके वर. 35 वर्ष  हे पत्नी अर्चना हाके वय. 27 वर्ष आणि दोन लहान मुलां समवेत राहत होते. काल बुधवारी  रात्री ११.३० च्या दरम्यान कामावरून रामचंद्र हा दारू पिऊन घरी आला. त्या दोघांमध्ये पंधरा वीस मिनिटं शाब्दिक वाद चालू होता.या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. दाराला आतून कडी लावून रामचंद्राने टॉवेल मध्ये दोन मोठे दगड बांधून अर्चनाच्या डोक्यामध्ये फिरवून घाव घातला.त्यानंतर  बाजूला झोपलेली त्याची मुले आरडा ओरडा करू लागले. तेव्हा रामचंद्र ने पोरांना दम दिला तू गप्प झोपतेस का, नाहीतर तुझं पण तुकड करीन असे सांगितले. त्यामुळे छोटी मुलगी भिऊन गप्प झोपली.
      यावेळी रामचंद्र ने दगडाचा आणखीन एक घाव पत्नीच्या डोक्यामध्ये घातला. शेजारीपाजारी दार वाजवू लागले तरी रामचंद्र ने दरवाजा उघडला नाही. संबंधित एका शेजारील इसमाने एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे मध्ये फोन केला असता पोलीस रात्री घटनास्थळी आले. पोलीस आल्यानंतर दरवाजा उघडल्यावर अर्चना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. पोलिसांनी आयुष हेल्प लाईन ला फोन करुन  जखमी महिलेला उपचारासाठी सांगली सिव्हिल मध्येे दाखल केले. उपचार चालू असताना डोक्यातून रक्तस्त्राव जादा झाल्याने आज सकाळी अर्चना मयत झाली. किरकोळ वादातून अर्चना हाके हिला जीव गमवावा लागला. त्यांची मुले लहान असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या गुन्ह्याचा  अधिक तपास पोलीस निरीक्षक नीरज उबाळे करत आहे.
 
उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपसिंह गिल यांनी घटनास्थळी  भेट देऊन पाहणी केली


Post a comment

0 Comments