Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात कोव्हीड योद्धाचा मृत्यू

शासन काय मदत करणार? याकडे सर्वांचे लक्ष
  विटा प्रतिनिधी
 गेल्या तीन ते चार महिन्यापासून कोरोना योध्दा म्हणून धडपडणाऱ्या साळशिंगे ता. खानापूर येथील तलाठी संजय विष्णू पाठोळे (वय-50 मुळ रा. गावठाण भेंडवडे) यांचे ह्रदयविकाराने दुर्दैवी निधन झाले.
        खानापूर तालुक्यातील साळशिंगे या गावातच प्रथम कोरोना चा शिरकाव झाला. आता पर्यंत या गावात एकूण 6 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गेल्या तीन- चार महिन्यात तलाठी पाटोळे यांनी दिवसरात्र स्वतःला झोकून देऊन काम केले होते.
दोन दिवसापासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती.मात्र ते सांगलीला पुढील उपचारासाठी जाऊ शकले नाहीत.
कोरोना मुक्तीसाठी लढा देणाऱ्या तलाठी संजय पाटोळे यांचे आज दुपारी  हृदयविकाराने दुर्दैवी निधन झाले.  त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. खानापूर तालुक्यातील साळशिंगे  येथे गेल्या तीन  महिन्यापूर्वी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला.त्यानंतर या गावातून रुग्णांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे गेली अनेक दिवस सातत्याने कंटेनमेंट असल्यामुळे या गावातील गाव कामगार तलाठी संजय पाटोळे यांना प्रशासकीय जबाबदारी पार पाडावी लागते. आपले काम पूर्ण निष्ठेने आणि जबाबदारीने पार पाडत असताना आज त्यांना त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
        गेल्या चार महिन्यापासून प्रशासकीय अधिकारी कर्मचारी कुटुंबाचा विचार न करता आपला जीव धोक्यात घालून कोरोना योद्धा  म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. स्वतःच्या आरोग्याकडे देखील बघायला त्यांना वेळ मिळत नाही. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. पाटोळे कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. आता शासनाने या कोरोना योद्धाच्या  कुटुंबाला  तातडीने मदत करावी, अशी मागणी तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण निकम यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments