Daily Mahasatta

Daily Mahasatta

आज सांगली जिल्ह्यात ८१ जणांची कोरोनावर मात


         सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्ताचा आकडा सातत्याने वाढत असून लाॅकडाऊनच्या काळात देखील प्रत्येक दिवशी शंभर पेक्षा अधिक रुग्णांची दररोज भर पडत आहे.आज  सोमवारी जिल्ह्यात १२१ रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.मात्र ८१ जणांनी आज कोरोनावर यशस्वी मात देखील  केली आहे        सांगली जिल्ह्यात आज नवीन १२१ रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये पुन्हा एकदा महापालिका  क्षेत्रामध्ये सर्वाधिक ९७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सांगली शहर ५६ तर मिरज शहरातील ४१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे आटपाडी-५ जत-६ , खानापूर -२,  मिरज-६, पलूस-२ ,वाळवा-१,  तासगाव-३ असे एकूण जिल्ह्यात १२१ जणांचे कोरोना  चाचणी अहवाल आज पाॅझीटीव्ह  आले आहेत.        सांगली शहरात जिल्हा परिषद, पोलीस विभाग, याच्यानंतर आता महापालिकेत देखील कोरोनाचा शिरकाव झाला असून आज एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर आणखी तिघा जणांना कोरोनाची लागन झाली आहे. विशेष म्हणजे आज दिवसभरात सांगली जिल्ह्यातील सात जणांचा मृत्यू झाला आहे.विशेष म्हणजे  आज सर्वाधिक ८१ रुग्णानी कोरोना  वर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments