Daily Mahasatta

Daily Mahasatta

नागेवाडीच्या सतिश निकमचा ' खलनायकी ' चेहरा जगासमोर
: नागेवाडीच्या सुपूत्रांची अनोखी कामगिरी
: मराठी चित्रपट सृष्टीत इतिहास घडणार
:  कोंदण हा मराठी चित्रपट होणार ऑनलाईन रिलीज.

सांगली ( राजेंद्र काळे )
          कोरोनाच्या संकटात हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टी अडचणीत आल्यामुळे अनेक दिग्गज निर्माते आपले चित्रपट आता थिएटर ऐवजी ऑनलाइन रिलीज करत आहेत. यामध्ये खानापूर तालुक्यातील नागेवाडी गावचे सुपुत्र दिग्दर्शक सचिन यादव हे देखील  आपला कोंदण हा चित्रपट उद्या शनिवार ता.१ ऑगस्ट रोजी ऑनलाइन रिलीज करत आहेत. या चित्रपटात शिवसेनेचे तालुकाप्रमुख युवा नेते सतीश निकम यांची  खलनायकाची जबरदस्त  भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, अशी माहिती दिग्दर्शक सचिन यादव यांनी महासत्ता न्यूज पोर्टलशी बोलताना दिली.
          दिग्दर्शक यादव म्हणाले, कोरोनाच्या या कठीण काळात संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी पुन्हा नव्या जोमाने उभी राहतेय. नवीन येणारे बरेच मोठे हिंदी चित्रपट ऑनलाईन रिलीज  होत आहेत. तर आपली मराठी चित्रपटसृष्टी देखील या मध्ये मागे कशी राहिल. सांगली जिल्हा ता. खानापूर गाव नागेवाडी  येथील दिग्दर्शक श्री सचिन अशोक यादव यांचा  कोंदण हा पहिला मराठी चित्रपट आहे जो लवकरच online या  https://www.cinemapreneur.com वेबसाईट वर येत्या १ ऑगस्ट रोजी  release  होणार आहे. आत्मनिर्भर भारताच्या  आत्मनिर्भर झालेल्या पहिल्या महिलेची कथा म्हणजेच कोंदण.
        या चित्रपटाची कथा सत्य घटनेशी प्रेरित असून अगदी वास्तवदर्शी पात्रे आपल्याला यात दिसून येतात.
  शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याची बायको त्याच्या दोन्ही लहान मुलांना घेऊन  कोणावरही अवलंबून न राहता , संकटाना तोंड देत, कशी आत्मनिर्भर होते, हे या कथेत आपणांस पाहायला मिळतं.या कथेत कृष्णा पवार हा शेतकरी दुष्काळामुळे, कर्ज न फेडता आल्याने आत्महत्या करतो. कृष्णाच्या आत्महत्येनंतर सरकारकडून मिळणारे अनुदान भ्रष्ट आधिकारी लूटतात. व त्याची बायको रूक्मिणी हिची फसवणूक करतात. तिथून तिच्या आयुष्याला संघर्षमय कलाटणी मिळते व तिच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाची सुरूवात होते संपूर्ण माळरानावर कोणाचीही मदत न घेता तिच्या मुलांचा सांभाळ करत ती शेतीला सुरूवात करते. त्यात बऱ्याच अशक्य वाटणाऱ्या आणि जीवघेण्या अडचणी देखील येतात. परंतु या सर्व अडचणींवर मात करून रूक्मिणी आणि दिपक आत्मनिर्भरतेने कशी शेती पिकवतात. हे आपणांस पाहायला मिळते.
          चित्रपटाची निर्मिती संस्था नाट्यवेद आर्टस्व आणि  निर्माते आहेत श्री अशोक यादव.
चित्रपटात मुख्य भुमिकेत समिक्षा  कदम, विक्रांत केदारे, सतीश निकम व बालकलाकार गुरूनाथ हिंदळेकर , आणि नागेवाडी गावातील इतर कलाकारांचा  देखील समावेश आहे. चित्रपटात "मन आभाळ" हे एकमेव गाणं आहे जे चित्रपटाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातं. या गाण्याचे गीतकार व संगीतकार आहेत एकनाथ मोरे व कुणाल खाडे आणि चित्रपटाचे पार्श्वसंगीत दिले आहे चिराग सोनी व राजेंद्र साळुंखे यांनी.


सतिश निकमचा खलनायकी चेहरा
     शिवसेनेचे तालुका तालुकाप्रमुख सतीश निकम हे  हाडाचा शिवसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या काळात गेल्या चार महिन्यात या कोरोना योध्याने जिल्हा प्रमुख संजय विभुते यांच्यासमवेत जिल्हाभरात पायाला भिंगरी बांधून काम केले. गोरगरिबांना जीवनावश्यक किटचे वाटप, अन्नधान्य, औषधे याचा पुरवठा करत हजारो लोकांना मदतीचा हात दिला. कोरोनाच्या  संकटाच्या काळातील हा हिरो प्रत्यक्षातील पडद्यावर मात्र आता क्रूर खलनायकाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे वास्तव जीवनातला हा नायक पडद्यावरील वरील खलनायकाची भूमिका कशी साकारतो? हे पाहणं सांगली जिल्ह्याला उत्सुकतेचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments