Daily Mahasatta

Daily Mahasatta

किर्लोस्कर हायस्कूलचे ' शंभर नंबरी ' यश...: दहावीच्या परीक्षेचा १०० टक्के निकाल
: सानिका पवार ९८.४० गुणासह प्रथम
: अध्यक्षा  प्रतिमा किर्लोस्कर यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन

किर्लोस्करवाडी, प्रतिनिधी
        किर्लोस्कर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाने सर्व बोर्ड परीक्षांमध्ये उत्कृष्ट यशाची  परंपरा कायम ठेवली आहे.  किर्लोस्करवाडी हायस्कूलचा दहावीचा  निकाल १०० टक्के लागला आहे. इतकेच नाही तर वर्गातील सर्व ४३  विद्यार्थी  ७५ टक्क्यांहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
      किर्लोस्कर हायस्कूलचे मुख्याध्यापक के. हरिंद्रनाथन म्हणाले की, “आमच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तम गुण मिळवले आहेत. तसेच शाळेचा १०० टक्के निकाल लागल्याने अत्यंत आनंद झाला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. प्रथम क्रमांकावर असलेल्या कुमारी सानिका आनंदराव पवार हिला ९८.४० टक्के मिळाले आहेत. ४३ विद्यार्थ्यांपैकी ३२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत.
     सानिका आनंदराव पवार ९८.४० टक्के मिळवत प्रथम क्रमांकावर आहेत तर साईराज जयंत माने ९७.४० टक्के गुणांसह दुसर्‍या क्रमांकावर आहेत. आशिष शिवाजी तांदळे ९७.२० टक्के गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहेत. सानिका आनंदराव पवार हिने गणितामध्ये ९९ गुण मिळविले आहेत.
       विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती. प्रतिमा किर्लोस्कर म्हणाल्या की, “ शाळेचा १०० टक्के निकाल लागल्याल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करते . या तुकडीमधील सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी पास झाल्याने मिळालेले हे यश पाहून मी भारावून गेले आहे. किर्लोस्कर हायस्कूलचा गेल्या कित्येक वर्षांत सातत्याने प्रभावी निकाल लागत असून यावर्षीही ही परंपरा अशीच पुढे नेऊ असा आमचा निर्धार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात शाळेने पहिले प्राधान्य दिले आहे. आम्हाला खात्री आहे की, आमचे विद्यार्थी केवळ शैक्षणिक परीक्षेतच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही सर्वच क्षेत्रांत झळकतील. 

Post a Comment

0 Comments