- जिल्ह्यातील एकूण आकडा २३०७ वर
- लाॅकडाऊन शिथील होण्यापूर्वीच कोरोनाचा विस्फ़ोट
सांगली, प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढीने आज सर्वच आकडेवारीचे विक्रम मोडीत काढले असून आज जिल्ह्यात २४१ रुग्णाची दिवसभरात वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरणा ग्रस्तांची संख्या २३०७ वर पोहोचली आहे.
शुक्रवार ता. ३१ रोजी सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल होत असून सर्व व्यवहार पुन्हा एकदा सुरळीत होणार आहेत. मात्र लाॅकडाऊन शिथील होण्यापूर्वीच जिल्ह्यात २४१ रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह. आल्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आज दिवसभरात महापालिका क्षेत्रात १४४ रुग्णांचे कोरणा पॉझिटिव्ह आले. यामध्ये सांगली शहर ६४ तर मिरज शहरातील ७० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दिवसभरात आटपाडी-२, जत -१६, कडेगाव -४, कवठेमंकाळ- ३ खानापूर-४ मिरज -३४, पलूस -२०, शिराळा -२, तासगाव-१२, वाळवा'-११ असे जिल्ह्यातील एकूण २४२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज दिवसभरात सांगली येथील दोघांचा मृत्यू झाला आहे.तर 81 लोकांनी आज कोरोनावर यशस्वी मात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे.
0 Comments