Daily Mahasatta

Daily Mahasatta

तासगाव तालुक्यात कोरोनाचे नवीन चार रुग्ण


तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 35 वर

सावळज, मांजर्डे, नागाव (नि), खुजगाव येथील रुग्णांचा समावेश : चिंचणी येथील वृद्धेचा मृत्यू 

तासगाव, ता.२५(प्रतिनिधी)

       तासगाव तालुक्यात शनिवारी कोरोनाचे 4 नवे रुग्ण आढळून आले. त्यामध्ये सावळज, मांजर्डे, नागाव (नि) व खुजगाव येथील रुग्णांचा समावेश आहे. तर आज सकाळी चिंचणी येथील एका 75 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. तालुक्यातील हा पहिला बळी ठरला. दरम्यान, आज 4 रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 35 वर पोहोचली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल सूर्यवंशी यांनी दिली.

      तालुक्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. आज एकाच दिवसात 4 रुग्णांची भर पडली. सावळज येथील एका 25 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. हा युवक काही दिवसांपूर्वी कुपवाड भागात लग्न समारंभासाठी जाऊन आला होता. तेथे त्याला लागण झाल्याचा संशय आहे. तर मांजर्डे येथील एका 46 वर्षीय पुरुषालाही आज कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

       नागाव (नि) येथे पुणे येथून आलेल्या एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर खुजगाव येथील 40 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. हा पुरुष लखनौ येथून आला आहे.

      आज एकाच दिवसात 4 नव्या रुग्णांची भर पडल्याने व चिंचणी येथील एका 75 वर्षीय वृद्धेचा बळी गेल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरू आहे. शिवाय त्या - त्या गावात बफर आणि कंटेन्मेंट झोनची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments