Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोनाचा हल्ला आणि विमा संरक्षण


सांगली प्रतिनिधी

आज संपूर्ण जगात बहुतांश देशात Covid-19 अर्थात कोरोना या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. डिसेंबर 2019 मध्ये वूहान या चिनी शहरात पहिल्यांदा सापडलेला व्हायरस 215 देशातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर इतका गंभीर परिणाम करेल असे कोणासही वाटले नव्हते. ह्या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असले तरी आजमितीला ह्या व्हायरसवर कोणतीही लस उपलब्ध नसल्याने त्याची तीव्रता अजूनच गंभीर आहे.
                    ह्या महामारीच्या पार्श्वभूमीवर आज विम्याची गरज आणि महत्व आणखीनच वाढले आहे. प्रगत राष्ट्रात विम्याला खूपच महत्व आहे पण भारतासारख्या भावनाप्रधान आणि विकसनशील देशात अजूनही दुर्दैवाने विम्याकडे म्हणावे तितक्या गांभीर्याने पाहिले जात नाही. आयुर्विमा हा आर्थिक नियोजनात अत्यंत आवश्यक आणि महत्वाचा घटक आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास आपल्याकडे इन्व्हर्टर ची सोय असते, आपल्याकडे 2-4 दिवस पाणी येणार नसल्यास आपण पुढे 4 दिवस पुरेल इतक्या पाण्याची व्यवस्था करतो पण उद्या आपणच नसल्यास आपल्या कुटुंबाला असणारी आर्थिक गरज कशी भागणार ह्या महत्वाच्या प्रश्नाकडे मात्र आपण अगदी सहज दुर्लक्ष करतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आयुर्विमा हा आपल्या उत्पन्नाचा बॅकअप प्लान आहे. आपल्या देशात आयुर्विमा करताना विमा क्षेत्रातील तज्ञांपेक्षा CA किंवा कर सल्लागारांना विचारले जाते हा मोठा विनोद आहे, आणि त्यामुळेच आपल्या देशात विम्याविषयी जागरूकता होण्यासाठी अजूनही खूप प्रयत्न करावे लागताहेत.
                         प्रत्येक कमावत्या व्यक्तीचा आयुर्विमा असणे हे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे आहे पण मृत्यूनंतर पैशाचा काय उपयोग किंवा आयुर्विमा मला पटत नाही किंवा माझे उत्पन्न विमा काढण्याइतपत पुरेसे नाही असली थातूरमातूर कारणे देऊन विमा सल्लागारांना टाळले जाते.  वस्तुस्थिती पाहिल्यास कुटुंबातील कर्ता व्यक्तीला आपला पुरेसा विमा आहे असे वाटते पण दुर्दैवाने तो कर्ता मृत झाल्यास बऱ्याच वेळा मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना विम्याची मिळणारी रक्कम ही नेहमीच कमी वाटते कारण कुटुंबप्रमुखाने पुरेसा आयुर्विमा उतरवलेला नसतो. म्हणजे तुमच्या आयुर्विम्याकडे पाहण्याच्या चुकीच्या दृष्टिकोनाचा फटका तुमच्या कुटुंबियांना सोसावा लागतो. आजकाल आपले दैनंदिन जीवन खूपच धकाधकीचे झाले असून बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांनी अकाली मृत्यू तसेच अपघाती मृत्यूचे प्रमाण खूपच वाढले आहे. अलीकडे सार्स, इबोला, स्वाइन-फ्लू यासारखे अनेक साथीचे रोग जगात पसरले पण आताच्या Covid-19 अर्थात कोरोनाने या सर्वांना मागे टाकून संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. त्यामुळे आता आयुर्विम्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. भारतातील शहरी भागात आयुर्विम्याविषयी जागरूकता येऊ लागली आहे पण ग्रामीण भागात अजून म्हणावे तितक्या गांभीर्याने पाहिले जात न्हवते पण आता त्याची प्रकर्षाने गरज जाणवू लागली आहे. लोक पूर्वी काढलेल्या आयुर्विमा पॉलिसींचे प्रिमियम (हप्ते) वेळेत भरत आहेत तसेच थोड्याफार प्रमाणात नवीन पॉलिसींच्या चौकशीचे प्रमाण पण वाढले आहे. Covid-19 साठी अल्प मुदतीच्या म्हणजे 6 ते 9 महिने मुदतीच्या आरोग्य विमा पॉलिसी उपलब्ध आहेत, पण सध्या बऱ्याच ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागात Covid-19 वरील उपचाराचा सर्व खर्च सरकार करत आहे.
  पण आयुर्विमा पॉलिसी काढताना त्या पॉलिसीमध्ये Covid सारख्या महामारी मध्ये मृत्यू झाल्यास आयुर्विमा संरक्षण दिले जाते का नाही हे पहिल्यांदा तपासले पाहिजे, कारण काही पॉलिसींमध्ये विशेषतः खाजगी विमा कंपन्यांमार्फत विकल्या जाणाऱ्या विमा पॉलिसींमध्ये फोर्स-मेजर ह्या क्लॉज अंतर्गत महामारीमध्ये मृत्यू झाल्यास विमा संरक्षण दिले जात नाही. आपण कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक आधार मिळण्यासाठी आयुर्विमा घेत असतो, आणि कोणत्याही कारणाने आयुर्विमा कंपनीने मृत्यूदावा नाकारल्यास त्या विमा पॉलिसीचा काहीच उपयोग होणार नाही, अशा वेळी मी अभिमानाने सांगू इच्छितो की आमच्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सर्व पॉलिसींमध्ये कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास विना हरकत मृत्यूदावा दिला जातो.
                   साधारणपणे तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान 25 ते 20 पट तुमचा आयुर्विमा असणे आवश्यक आहे. त्यामुळे बदललेल्या धावपळीच्या आणि धोकादायक परिस्थितीत तुमचा आयुर्विमा पुरेसा आहे का हे आधी तपासा, पुरेसा असल्यास उत्तमच, पण नसल्यास आजच तुमच्या विमा सल्लागारांशी संपर्क साधा आणि तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करा आणि निश्चिंत / निर्धास्त व्हा. थोडक्यात आयुर्विमा म्हणजे तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता... "जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी"...

लेखक-
श्री प्रवीण दाते
विकास अधिकारी
भारतीय आयुर्विमा महामंडळ
शाखा- विटा
संपर्क- 9422407565
Email- praveen.date@licindia.com prawindate@gmail.com

Post a Comment

1 Comments

  1. Good information about life insurance. For such huge quantities we must go for term insurance I think.

    ReplyDelete