Daily Mahasatta

Daily Mahasatta

जिल्हा बँकेकडून शेतकर्‍यांची लुबाडणूक: शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव माने 

सागंली, प्रतिनिधी
     जिल्हा बँका पीककर्ज वाटप करताना अवाजवी कागदपत्रे मागणी करून समस्त पीककर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांची लुबाडणूक करत आहेत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मनमानी कारभाराला जिल्हाधिकारी लगाम लावणार की नाही ? असा सवाल  शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव माने केला आहे.
         जिल्हाअध्यक्ष माने म्हणाले, ३०एप्रिल २००७  शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी एक शेतकरी शिष्टमंडळ घेऊन रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळास जिल्हा बँका पीककर्ज वाटप करताना अवाजवी कागदपत्रे मागणी करून समस्त पीककर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांची कशी लुबाडणूक करतात हे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर रिझर्व बँकेने त्याच विशेष बैठकीनंतर ३०एप्रिल २००७ रोजी कोणत्याही प्रकारची अवाजवी कागदपत्रांची मागणी करू नये, असे स्पष्ट परिपत्रक काढून सक्तीचे आदेश दिले. मात्र  आजही जिल्हा बँकेला त्या परिपत्रकाचा विसर पडला आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव माने यांनी केला आहे,
     शेतकरी संघटनेच्या तक्रारी वरून रिझर्व्ह बँकेने १८ जून २०१० आणि ७ एप्रिल २०१९ या दोन्ही परिपत्रकात ५० हजार रुपयांची कर्जमर्यादा एक लाख रुपये पर्यत केली. रिझर्व्ह  बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी जुन्यापरिपत्रकात सुधारणा करून ७एप्रिल २०१९ रोजी ही कर्जमर्यादा एक लाख साठ हजार रुपये केली आणि एवढ्या रक्कमेपर्यत स्वंयम घोषणा पत्र घेऊन कर्जवितरण करावे असे आदेश दिले, पण जिल्हा बँका पीककर्ज वाटप करताना जाणिवपूर्वक शासन आदेश नसताना ही निव्वळ राजकारणासाठी शेतकर्‍यांच्या अज्ञानीपणाचा फायदा उठवत आहेत.  फक्त त्रास देण्याच्या उद्देशाने सर्वसामान्य शेतकर्‍यांना पीककर्जपासून वंचित ठेवून गावागावातील गटातटाचे राजकारण जिवंत ठेवण्यासाठी बँकेचा वापर सुरू असल्याचा आरोपही अशोक माने यांनी केला.
         शेती कर्ज हे सरकारीधोरणात प्राधान्यक्रम आहे, बँकिंग रेग्युलेशन करण्यासाठी यासाठी रिझर्व्ह बँक ही स्वायत्त संस्था नाबार्ड मार्फत राज्य सहकारी बँक,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व विकास सोसायटी अशी त्रिस्तरीय संस्थांच्या मार्फत शासकीय योजनेत शेतीकर्जाला प्रधानक्रमाने वितरित करण्यात सुलभता असावी म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व देखरेखीखाली व्हावी अशी व्यवस्था आहे.  मात्र संबंधित यंत्रणाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे  पीककर्जा संबंधित सुरू असलेला जाणिवपूर्वक  घोळ मिटवण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी  लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव माने यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments