विटा, प्रतिनिधी
विटा शहरातील आयटीआय कॉलेज जवळील मुजावर वस्तीत राहणाऱ्या आणखी ४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी साळशिंगे रस्त्यावरील मुजावर वस्ती येथील एका भाजीविक्रेत्याच्या वडिलांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या मुलाला म्हणजेच विट्यातील भाजीविक्रेत्या ला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता त्या भाजीविक्रेत्याचा भाऊ वय -५१ आणि पुतण्या वय-२४ आणि २१ वर्ष वयाच्या दोन महिलांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
0 Comments