कुपवाड (प्रतिनिधी)
कोरोना या भीषण आजारा पासून बचावासाठी आज कुपवाड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पोलीसांना फेस शिल्ड चे वाटप करण्यात आले.
जगामध्ये कोरोना या महाभयानक रोगाने अक्षरशः थैमान घातले आहे. पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी जीव पणाला लावून काम करत आहेत. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी या लढ्यात आपले प्राण ही गमवावे लागले आहेत.त्यामुळे आज कुपवाड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क शिल्ड वाटून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे
या शिल्डचे वाटप कुपवाडचे राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष संजय तोडकर यांच्या हस्ते आज कुपवाड पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे ,सदाम मुजावर, माने व जमादार उपस्थित होते.
0 Comments