Daily Mahasatta

Daily Mahasatta

आ. मानसिंगभाऊ सामाजिक कार्यात अग्रेसर    रिळे (ता. शिराळा) - सॅनिटायजर मशिनचे मोफत वाटप 
    करताना युवा नेते विराज नाईक. शेजारी इतर मान्यवर 

: वाढदिवसानिमित्त सॅनिटायजर मशीनचे वाटप.

शेडगेवाडी/ वार्ताहर   
     आमदार मानसिंगभाऊ विकास कामाबरोबर सामाजिक कार्यात देखील नेहमी अग्रेसर राहिले आहेत, असे प्रतिपादन युवा नेते विराज नाईक यांनी केले.आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रिळे, अस्वलवाडी, पावलेवाडी, मांगरूळ, मोरेवाडी, बेलेवाडी, शिंदेवाडी येथील प्राथमिक शाळांसाठी सॅनिटायजर  मशीन मोफत वाटप करतावेळी ते बोलत होते.
   युवा नेते नाईक म्हणाले, सत्ता असो अथवा नसो आमदार मानसिंगभाऊ विकास कामात अग्रेसर राहिले आहेत. सहकार, व्यवसाय, उद्योग, सार्वजनिक, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यात ते सर्वात पुढे आहेत. त्यामुळेच सामाजिक प्रगतीसाठी झटणाऱ्या नेतृत्वाला जनतेने पुन्हा लोकप्रतिनिधी बनवले आहे. कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्हा परिषद शाळांना सॅनिटायजर  मशिनचे मोफत वाटप करून त्यांनी शाळकरी मुलांना सुरक्षा कवच दिले आहे.
         या वेळी माजी सरपंच एम एस पाटील, सरपंच बाजीराव पाटील, सोसायटी चेअरमन शिवाजी पाटील, बाबासो पाटील, दीपक दोडके, रघुनाथ बंडगर, तानाजी पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष पुरोषोतम कांबळे, डी. बी. पवार, गणपती पाटील, दिनकर खामकर, प्रवीण पाटील तर, मोरेवाडी येथे नामदेव शेणवी, विजय पाटील, सुधीर कुंभार, प्राचार्य सुवर्णसिंग मस्के, बेलेवाडीचे माजी सरपंच दिलीप जाधव, सोसायटी अध्यक्ष अनिल जाधव तसेच शिक्षक परशुराम टिळे, सुदाम पाटील, शिवाजी पाटील, गोरक्ष कुंभार, दिलीपकुमार मोरे, सुदर्शन भंडारे व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
..............................
 

Post a Comment

0 Comments