Daily Mahasatta

Daily Mahasatta

तासगाव कारखान्याची मालमत्ता कंपनीच्या ताब्यात

कारखान्याचे 5 लाख मेट्रिक टन गाळप होणार, खासदार संजय काका यांची माहिती

तासगाव, (प्रतिनिधी)
       महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि . मुंबई यांनी मा. उच्च न्यायालय मुंबई यांचे आदेशानुसार तासगाव -पलूस तालुका सहकारी साखर कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करून एस.जी.झेडअॅन्ड एस.जी.ए शुगर्स (जे.व्ही) लि या कंपनीच्या ताब्यात दिली आहे .कारखान्याची मालमत्ता रितसर ताब्यात मिळाल्यानंतर कारखाना चालू वर्षी गळीतास सज्ज झाला आहे, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
       यंदा 5 लाख मेट्रिक टन गाळप करणार असल्याची माहिती खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.  यामुळे शेतकरी व कामगारांमध्ये उत्साह असून यातून मोठा रोजगार निर्माण होईल असे ते म्हणाले. यावेळी मॅनेजिंग डायरेकटर आर डी पाटील उपस्थित होते.
     खा. पाटील म्हणाले की येणाऱ्या गळीत हंगाम २०२०-२१ ची पुर्व तयारी सुरु केली आहे . तासगाव व पलूस तालुक्यातील तसेच कार्यक्षेत्रालगतच्या मिरज, कडेगाव कवठेमहांकाळ व खानापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या गळीतास येणाऱ्या उसाच्या नोंदी घेणेचे काम सुरु आहे . कारखान्याची मशिनरी २०१२-१३ हंगामापासून बंद अवस्थेत आहे त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरु केले आहे.
      तासगाव -पलूस तालुका कारखान्याकडे पूर्वी काम केलेले तांत्रिक व कुशल कामगार - कर्मचारी सदरचे काम करीत आहेत. कारखाना उभारणीसाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत त्या जमीनदार कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कामकाजासाठी रुजू करून घेतले आहे .
         खासदार संजयकाका म्हणाले, तासगाव व पलूस तालुक्याचे वैभव असणारा हा कारखाना सक्षमपणे चालवून ऊस उत्पादक शेतकरी ,तोडणी वाहतूक करणारे वाहतूक कंत्राटदार , कारखान्याकडे काम करणारे अधिकारी कर्मचारी व कामगार बंधू यांच्या सहकार्याने परिसराचा सर्वांगीण व विकास होण्यासाठी सर्व संबधित घटकांना योग्य न्याय देण्यासाठी कटिबद्ध असुन सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन खासदार संजयकाका पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments