: अरुण (अण्णा) लाड, शरद लाड यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन
कडेगाव (कुलदीप औताडे)
चिंचणी ता.कडेगाव येथील श्री शिवाजी हायस्कूल, चिंचणी या विद्यालयाचा दहावी बोर्डाचा निकाल १०० टक्के लागला आहे. कु. साक्षी प्रताप महाडीक हिने ९८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. कु. साक्षी ही पत्रकार प्रताप महाडिक यांची कन्या आहे. तसेच ऋषिकेश सुभाष महाडिक व श्रेया वैभव जाधव यांनी अनुक्रमे ९७.८० आणि ९५.४० गुण मिळवून द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि विद्यालयाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. संस्थेचे अध्यक्ष मा.अरुण
( अण्णा )लाड , जिल्हा परिषद सदस्य शरद (भाऊ) लाड, शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एस. बारामती यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
0 Comments