Daily Mahasatta

Daily Mahasatta

बलवडी-कुंडल रस्त्यातील खड्डयात वृक्षारोपण बलवडी फाटा-कुंडल दरम्यान रस्‍त्यातील  खड्डयात 
   वृक्षारोपण  करुन निषेध  करताना शेतकरी.

      पलूस (प्रतिनिधी)
       राज्‍य महामार्गाच्‍या निकृष्‍ट कामामूळे रस्‍ता एक महिन्‍याच्या आत खचून  ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्‍यामूळे कुंडल (ता.पलूस) येथील शेतक-यांनी बलवडी-कुंडल रस्‍त्यातिल या खड्डयात वृक्षारोपण करुन शासनाचा आणि ठेकेदाराचा निषध केला आहे .
     विटा-पेठ-मलकापूर हा राज्‍यमार्ग कुंडल मार्गे जातो. हा रस्‍ता करताना  ठेकेदारने कोणत्‍याही नियमांचे पालन केले नाही. हा रस्‍ता करुन फक्‍त एक महिना झाले आहे तरीही या रस्‍त्‍यावर बलवडी फाटा ते कुंडल दर्म्‍यान खड्डे पडले आहेत आणि या खड्डयांचे पॅच वर्क रस्‍ता पुर्ण होण्‍यापुर्वीच ठेकेदाराला करण्‍याची वेळ आली आहे.
ठेकेदाराने  नियमाप्रमाणे यापुर्वी असणारा रस्‍ता उकरुन नवीन रस्‍त्‍यामध्‍ये खडी टाकून, त्‍यावर बारीक खडीचा थर आणि नंतर डांबराचा थर टाकून त्‍यांचे चांगल्‍या प्रकारे रोलींग करणे अपेक्षीत होते. तसेच पुर्ण रस्‍ता हा ठरावीक मापाने होणेही क्रमप्राप्‍त होते. परंतू ठेकेदाराने या सर्व नियमांच कुठेच पालन केल्‍याचे दिसत नाहि. तसेच बाजूपट्टी उकरुन त्‍यामध्‍ये खडी आणि मुरुम भरणे गरजेचे होते परंतु त्‍यामध्‍ये फक्‍त माती भरणेचा प्रताप या ठेकेदाराकडून केला गेला आहे. या ठेकेदारांच्‍या सुपरव्‍हायजरांना  येथील शेतक-यांनी वेळोवेळी निदर्शनास हि बाब आणून दिली होती. या निकृष्‍ठ कामाचे चित्रीकरण करुन त्‍याची चित्रफित या विभागाचे उपअभियंता मा. भाऊसाहेब हजारे  यांनाही पाठविल्‍या आहेत पंरतू आजवर त्‍यांची कोणीही दखल घेतली नाही.
साईड पट्टीचे काम (डब्‍लुबीएम) पुर्ण झालेनंतर हॉटमिक्‍स डांबरीकरण करताना हॉटमिक्‍स पेव्‍हरने होणे आवश्‍यक होते. तसेच यासाठी व्‍हायब्रेटींग रोलर वापरणे गरजेचे होते. परंतू ठेकेदाराने त्‍यावर हॉटमिक्‍स मटेरिअल डंपरने आणून ढीग टाकून लोडरने पसरले आहे आणि हे सर्व साध्‍या रोलरने रोलींग केले आहे. इतक्‍या निकृष्‍ठ दर्जाचे काम करुन हा ठेकेदार शासनाच्‍या पैशाचा गैरवापर तर करतच आहे परंतू मोठा भ्रष्‍टाचारही करत आहे अशी टिका शेतक-यांनी केली.
तसेच या परिसरात  साखर कारखाने, औद्योगीक वसाहत असल्याने विटा कुंडल मार्गावर अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते . त्यात हा रस्ता टिकणार कसा हा प्रश्न वेळोवेळी उद्भवत आहे .या रस्‍त्‍याची सखोल चौकशी व्‍हावी, आणि दोषींवर कारवाई व्‍हावी या बाबतचे निवेदन मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे, रस्‍ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्‍हाण यांनाही पाठविले आहे. यावेळी जिल्‍हा बँकेचे संचालक किरण लाड, रस्‍ता संघर्ष समितीचे अध्‍यक्ष श्रीकांत लाड, वसंत लाड, अधिक थोरबोले, विजय लाड, मुकुंद जोशी, चंदर नांगरे यांचेसह बहुसंख्‍य शेतकरी उपस्थित होते.

अन्यथा आंदोलन करु...

या रस्‍त्‍याचे काम अतिशय निकृष्‍ठ होत आहे, याबाबतची  कल्‍पना संबंधीत अधिका-यांना दिली आहे तरीही त्‍यांवर अद्याप काहीही कारवाई करणेत आली नाही. हा रस्‍ता शासकीय नियमानुसारच व्‍हावा नाही तर आम्‍ही याबाबत आंदोलन करु

किरण लाड, संचालक जिल्‍हा मध्‍यवर्ती बँक

Post a Comment

0 Comments