इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे )
वाळवा तालुक्यातील आणखी सात जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी दिली आहे.
इस्लामपूर शहरातील किसानगर येथे बुधवारी (ता. २९) पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या घरातील कोरोनाबाधित महिलेचा पती व सून दोन्ही पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच ब्राह्मणपुरी परिसरातील ३० वर्षांचा पुरुष पॉझिटिव्ह आलाआहे. तो पुण्याहून २० जुलै रोजी इस्लामपुरात आला आहे. शिगाव (ता. वाळवा) येथे दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये शिरोली एमआयडीसी येथे काम करत असलेल्या ४९ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला आहे. तर तारदाळ एमआयडीसी येथे काम करत असलेल्या ५५ वर्षीय पुरुषही पॉझिटिव्ह आला आहे. कोरेगाव (ता. वाळवा) येथील वारणा दूध संघामध्ये काम करत असलेला ५२ वर्षाचा पुरुष पॉझिटिव आला आहे. तसेच भडकंबे येथील ३१ वर्षाचा पुरुष पॉझिटिव्ह आला आहे. तो वाहन चालक म्हणून काम करतो.
0 Comments