Daily Mahasatta

Daily Mahasatta

एमपीएससी परिक्षेत ऋषीकेश कांबळे राज्यात दुसरा तासगावच्या  'अँम्बिशस' अकॅडमीचा स्पर्धा परिक्षेत यशाचा झेंडा 

: रुपाली पाटीलने पटकावला  राज्यात चतुर्थ क्रमांक
: महाराष्ट्र लोकसेवा आयोग क्लार्क परिक्षेचा निकाल

तासगाव, ( संजय माळी)
       येथील अँम्बिशस करीयर अकॅडमी या संस्थेच्या 2 विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क परिक्षेमधून मंत्रालय क्लार्क पदी निवड झाली आहे. संस्थेच्या ऋषीकेश उदय कांबळे (तासगाव) याची एस. सी. कॅटेगरीमधून मुलांमध्ये राज्यात 2 ऱ्या क्रमांकाने निवड झाली आहे तर, रुपाली राजाराम पाटील (ढवळी) हिची एस ई बी सी कॅटेगरीमधून मुलींमध्ये राज्यात 4 थ्या क्रमांकाने निवड झाली आहे. एम. पी. एस.सी. सारख्या अवघड परिक्षांमधून ग्रामीण भागातून राज्यात अव्वल गुणांनी निवड झाल्यामुळे सर्व तालुक्यातुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
          त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात लागलेल्या लोकसेवा आयोगाच्या कर सहाय्यक या अधिकारी पदावरही पुन्हा दोघांचीच अनुक्रमे 2 ऱ्या व 5 व्या क्रमांकाने निवड झाली. त्यामुळे सर्व तालुक्यातून अँम्बिशस करीयर अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. गतवर्षी 2019 मध्ये झालेल्या परीक्षांचे निकाल हळूहळू येत असून राज्यात अव्वल येऊन यश मिळवून देणाऱ्या अँम्बिशस अकॅडमी ने आपल्या उज्वल यशाची परंपरा जपली आहे.
         2019 मध्ये झालेल्या जिल्हा निवड समितीच्या तलाठी परिक्षेमधून संस्थेचा प्रमोद अर्जुन साळुंखे (तासगाव) याची संपूर्ण जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे, जुलै महिन्याच्या सुरुवातीस त्याची तलाठी म्हणून आटपाडी येथे नियुक्ती झाली आहे. तर राष्ट्रीयीकृत बँकेच्या कर्मचारी निवडी करता घेण्यात येणाऱ्या आय बी पी एस मार्फत सुशांत संभाजी हंकारे (सावळज) याची बँक ऑफ इंडियाच्या क्लार्क पदी निवड झाली आहे.
        स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवून अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करणारी ग्रामीण भागातील विश्वसनीय संस्था म्हणून  अँम्बिशस अकॅडमी नावारूपास येत असून, केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांना यश मिळताना दिसून येत आहे.सर्व विषयांना वेगवेगळे तज्ञ मार्गदर्शक, स्पर्धा परीक्षांच्या पूर्व व मुख्य परीक्षेसाठी लागणारी सर्व पुस्तके संस्थेच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत, ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी मुख्य परीक्षांच्या तयारीसाठी प्रशस्त व वेगळी अभ्यासिका अशी सुविधा असणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणून अँम्बिशस करीअर अकॅडमी चा नावलौकिक आहे.
    सर्व  यशस्वी विद्यार्थ्यांना संचालक हर्षवर्धन घाडगे, प्रा अजित सलगर, प्रा एस पी तुपे, शुभांगी सानप, पी एस आय भारत भोसले, सचिन साळुंखे, प्रा इद्रिस पठाण, प्रा ज्ञानेश्वर मगर, प्रा प्रवीण कडू पुणे, , प्रा संदीप सुतार, प्रा डॉ चेतना साळुंखे, प्रा विकास माने  यांचे मार्गदर्शन लाभले. 


Post a Comment

0 Comments