Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यूसांगली प्रतिनिधी
            सांगली जिल्ह्यात आज ३४ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर सांगली  महापालिका क्षेत्रातील चार आणि अन्य जिल्ह्यातील दोन असा एकूण सहा जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे.
           जिल्ह्यात आज ३४ कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून  जिल्ह्यातील  कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १,१०८ इतका झाला आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्ण संख्येने उच्चांक गाठला होता. दररोज ६० ते ७० नवीन रुग्णांची भर पडत होती. मात्र आज काही प्रमाणात जिल्ह्याला दिलासा मिळाला.आज नवीन ३४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक १९ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये सांगली शहरातील १४ तर मिरज शहरातील ५ रुग्णाचा समावेश आहे. तसेच कडेगाव तालुका- दोन, कवठेमंकाळ तालुका- २, विटा -१, मिरज तालुका -२ शिराळा तालुक्यातील -२,वाळवा तालुका- इस्लामपूर-१ आणि कामेरी३ असे एकूण बत्तीस रुग्णांचे अहवाल आज पॉझिटिव आले आहेत. तर आज सांगली महापालिका क्षेत्रातील सांगली शहरातील विजयनगर, आंबेडकर नगर, आणि बुरुड गल्ली तसेच  मिरजेतील अष्टविनायक नगर येथील एक असा चौघांचा आणि अन्य जिल्ह्यातून उपचारासाठी आलेल्या बेळगाव आणि अथणी येथील दोघांचा असा एकूण सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात आज आखेर ११०८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यापैकी ४३९रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर सध्या ६२८ रुग्णांवर विविध रुग्णालयातून उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.  संजय साळुंखे यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments