Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात आज ९५ नवीन रुग्ण


सांगली  ता. २५ प्रतिनिधी
     सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येचा आलेख वाढत असून आज शनिवार तारीख २५ रोजी ९५ रुग्णांचे कोरोना  अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांची एकूण संख्या १ हजार ५४५ वर पोहोचली आहे.
          सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून आता प्रतिदिवस शंभरच्या दररोज कोरोना रुग्णांची वाढ सुरू आहे. आज शनिवारी एका दिवशी जिल्ह्यात ९५ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सांगली महापालिका क्षेत्रातील ५७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यामध्ये सांगली शहरातील ३८ तर मिरजे १९  रुग्णांचा समावेश आहे. तसेच आटपाडी तालुक्यातील १८, जत-१, कवठेमंकाळ-२ मिरज-६ पलुस- २, शिराळा-२, तासगाव-४, वाळवा-३ असे एकूण ९५ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.
            आज दिवसभरात ४१ रुग्णानी कोरोना मात केली आहे.त्यामुळे आत्तापर्यंत कोरणा मुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा ७५४ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात सांगली जिल्ह्यातील चार रुग्णांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे. आज दिवसभरात अन्य जिल्ह्यातील पाच रुग्णांचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आले आहेत ,अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments