Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा अपघातातील दुसर्या तरुणाचा मृत्यू
: अजय लवळे यांच्या मृत्यूनंतर पारे गावावर शोककळा
   
विटा, प्रतिनिधी
     विट्याहुन सांगलीच्या दिशेने निघालेल्या स्विफ्ट गाडी मारुती सुझुकी शोरूम समोरील वळणावर सोमवार रात्री चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाली होती. या भीषण अपघात पारे येथील अजय कालिदास गुरव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.  यानंतर अपघातातील गंभीर जखमी असणाऱ्या अजय ज्योतिराम लवळे या 26 वर्षीय तरुणाचा सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अजय गुरवनंतर या अपघातात अजय लवळे याचा मृत्यू झाल्याने पारे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. तर  गंभीर जखमी अजित बबन माने याची प्रकृती सुधारत असून यांच्यासह अन्य जखमीवर विट्यातील ओमश्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments