Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात कोरोना रुग्णांना आता घरीच उपचारसांगली, प्रतिनिधी         कोरोना  पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर देखील कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसलेल्या तसेच हृदयविकार, श्वसनाचे विकार, मधुमेह, रक्तदाब  यासह अन्य गंभीर आजार नसलेल्या साठ वर्षाखालील रुग्णांवर आता घरीच उपचार केले जाणार आहेत.विटा शहरात देखील अशा रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात येणार असून फिरत्या वैद्यकीय पथकामार्फत त्यांना वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील, अशी माहिती विटा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश लोखंडे यांनी माहिती दिली आहे.       याबाबत अधिक माहिती अशी, कोरोनाची लक्षणे व इतर आजार नसलेल्या कोरोनाग्रस्त व्यक्तींना आता कोरोना  केअर सेंटर अथवा शासकीय रुग्णालयात दाखल करण्याऐवजी आता त्यांना थेट घरातच उपचार घेण्याची योजना जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यासाठी संबंधित रुग्णाच्या घरात स्वतंत्र खोली आणि  स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा असणे आवश्यक आहे.       शनिवारी रात्री  जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून  संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गोपाल गिरी गोसावी, राष्ट्रीय आरोग्य मिशनचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर विनायक पाटील यांच्यासह विविध तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्स  मध्ये सहभाग घेतला.      सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात सुमारे पंधराशे पेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत. त्यामुळे आता उपचारा खालील रुग्णसंख्या साडेसात झाली आहे.  कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोरोना रूग्णालय, कोरोना केअर सेंटर संस्थात्मक विलगीकरण  यावर मोठ्या प्रमाणात ताण येऊ लागला आहे.अशा परिस्थितीत लक्षणे नसलेल्या मात्र पॉझिटीव्ह असलेल्या व्यक्तींसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र  या रुग्णाना हृदयविकार, श्वसनाचे  विकार, मधुमेह, रक्तदाब व अन्य स्वरूपाचे गंभीर आजारी नसावेत.      फिरते वैद्यकीय पथक : डाॅ.  लोखंडे      या  होम आयसोलेशन होणाऱ्या रुग्णांना सर्व अटी व नियम शर्ती मान्य करावे लागतील तसेच होम आयसोलेशन मध्ये स्वतःच्या जबाबदारीवर राहिन. घराबाहेर पडणार नाही. घराबाहेर पडल्यास कारवाईस पात्र राहीन, असे प्रतिज्ञापत्र शासनाला द्यावे लागणार आहे. घरात राहून उपचार घेणार्या रुग्णांवर शासनाच्या  फिरत्या वैद्यकीय पथकामार्फत नियमित उपचार केले जाणार आहे. या पथकाचे संपर्क क्रमांक संबंधित रुग्ण आणि नातेवाईकांना देण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ अविनाश लोखंडे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments