Daily Mahasatta

Daily Mahasatta

बिब्ब्या रोगाने डाळींब बागा उद्ध्वस्त
कवठेमंहकाळ, (अभिषेक साळुंखे ) 
        डाळिंबावरील बिब्ब्या रोगाच्या हल्ल्यामुळे बागायतदार हैराण झाले आहेत . लगरंपेठ ( ता . कवठेमहांकाळ ) येथील सुमारे शंभर एकर क्षेत्रावरील डाळिंबबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत . बिब्ब्या रोगाने  डाळिंबामध्ये अळ्या पडल्या आहेत. त्यामुळे  शेतकऱ्यांना बागेतील डाळिंबे तोडून फेकून देण्याची वेळ आली आहे.
    कवठेमहांकाळ तालुक्याच्या पूर्व भागातील ढालेवाडी, लगरंपेठ,नागज , निमज , ढालगाव , चोरोची , दुधेभावी , आरेवाडी परिसरात डाळिंब बागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे . परिसरातील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीत डाळिंबबागा जीवापाड जपल्या आहेत . मात्र सध्या खराब हवामानामुळे बिब्ब्या रोगाने शेतकऱ्यांना हैराण केले आहे . मार्च आणि एप्रिल महिन्यापासून छाटणी झालेल्या बागांमधील डाळिंबे बिब्ब्या रोगाने खराब झाली आहेत . डाळिंबे झाडावरच नासल्याने बागांजवळ दुर्गंधी पसरली आहे .
       डाळिबांच्या झाडांवर कु - हाडीचे घाव घालण्याची वेळ आली आहे . महागड्या औषधांची फवारणी करूनही रोग आटोक्यात न आल्याने बागायतदार निराश झाले आहेत. लगरंपेठ येथील प्रगतशील डाळिंब बागायतदार श्रीधर घेरंडे यांच्या मालकीची वीस एकर डाळिंबाची बाग बिब्ब्या रोगाने उद्ध्वस्त झाली
आहे. गोपाळ साळुंखे,सजंय आठवले, दिलीप आठवले समाधन साळुंखे,दादासो साळुंखे यांच्यासह सुमारे पन्नास शेतकऱ्यांची शेकडो एकर डाळिंब बाग बिब्ब्या रोगाने संकटात आली आहे . बिब्ब्या रोगाने शेतकऱ्यांवर फार मोठ्या नुकसानाची आपत्ती आली आहे . शासनाने नुकसान झालेल्या डाळिंबांच्या बागांचे पंचनामे करून भरपाई द्यावी , अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
  
चौकट....
    गेल्या तीन महिन्यांत छाटणी झालेल्या डाळिंबांच्या बागांवर बिब्ब्या रोगाने घाला घातला आहे . खराब हवामानामुळे महागड्या औषधांची फवारणी करूनही काही उपयोग झाला नाही . माझ्या मालकीची वीस एकर क्षेत्रातील पक्व झालेली डाळिंब तोडून फेकून दिली आहे . या परिसरात डाळिंब बागांचे तातडीने पंचनामे केले पाहिजेत . शेतकऱ्यांना शासनाने भरपाई देण्याची आवश्यकता आहे .
                                डॉ. सुदर्शन घरडे
                                 प्रगशील शेतकरी

Post a Comment

0 Comments