Daily Mahasatta

Daily Mahasatta

खानापूर तालुक्यात आणखी दोन पॉझिटिव्हविटा प्रतिनिधी
       खानापूर तालुक्यात आणखी दोघा रुग्णांचे कोरोना  चाचणी अहवाल पॉझिटिव आले आहेत. यामध्ये मंगरूळ येथील 60 वर्षीय पुरुष आणि  तांदळगाव येथील 35 वर्षाचा पुरुष या दोघांचा समावेश आहे.
       याबाबत अधिक माहिती अशी मंगरूळ येथील साठ वर्ष वयाच्या व्यक्ती ला कोरोनायची लागण झाल्याचा अहवाल समोर आला आहे.  या व्यक्तीची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. मात्र त्यांचा मुलगा तासगाव येथे डॉक्टर आहे . या व्यक्तीला 24 रोजी सांगली येथे दाखल करण्यात आले होते. तसेच आंध्र प्रदेशातून 25 रोजी तांदळगाव येथे आलेल्या एका 35 वर्षीय गलई दुकानदाराचा  कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव आला आहे. या दोघांवरही भारती हॉस्पिटल मिरज येथे उपचार करण्यात येत आहेत. तसेच करंजे गावातील 11 जणांचे कोरोंना अहवाल नेगेटिव आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आणि लोखंडे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments