Daily Mahasatta

Daily Mahasatta

तासगाव तालुक्यात कोरोनाचा बळीतासगाव : प्रतिनिधी
       तासगाव तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. चिंचणी येथील ७५ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा आज उपचारादरम्यान  मृत्यू झाला, अशी माहिती तहसीलदार कल्पना ढवळे यांनी दिली आहे.      
          जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दररोज शंभरहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. काल शुक्रवारी  एकाच दिवशी जिल्ह्यात 166 इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्णांची  वाढ झाली.  मात्र जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात मात्र रुग्ण संख्या मर्यादित  ठेवण्यात चांगले यश मिळवले आहे.  जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच केवळ 33  रुग्णसंख्या तासगाव तालुक्यात आहे. गेल्या चार महिन्यात तासगाव तालुक्‍यात एकही कोरोना  रुग्ण दगावला नव्हता. मात्र नुकतेच चिंचणी येथील 75 वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यातील हा कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. नागरिकांनी आज पर्यंत कोरोना  रोखण्यात  चांगले सहकार्य केले आहे, यापुढील काळात देखील  प्रशासनाला जास्तीत जास्त सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार कल्पना ढवळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments