Daily Mahasatta

Daily Mahasatta

अखेर सांगली जिल्हा.. लाॅकडाऊनसांगली  प्रतिनिधी : कोरोनाग्रस्तांच्या संख्येत  झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सांगली जिल्ह्यात बुधवार ता. 22 ते 30 जुलै पर्यंत लाॅकडाऊन  करण्यात येत आहे, अशी घोषणा जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चौधरी यांनी केली आहे.
      सांगली जिल्ह्यात नुकताच कोरोनाग्रस्त रुग्णांनी 1000 चा टप्पा पूर्ण केला. तसेच दररोज सरासरी 60 ते 70 रुग्णांची वाढत आहे. त्यामुळे आगामी पावसाळी वातावरण आणि कोरोना चा वाढता कहर याचा विचार करून सांगली जिल्ह्यातील महापालिका , नगरपालिका, नगरपंचायत, या ठिकाणी कडक लाॅकडाऊन करण्याचा निर्णय पालकमंत्री जयंत पाटील  आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि विविध विभागाचे प्रशाकीय अधिकारी उपस्थित होते. सांगली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या सातारा, आणि कोल्हापूर जिल्हा नंतर आता सांगली जिल्हा देखील बुधवार 22 रोजी रात्री पासून ते 30 जुलैपर्यंत लाॅकडाऊन केला जाणार आहे. या काळात दवाखाने, बँका, मेडिकल, दूध आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

Post a Comment

0 Comments