Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात भाजीविक्रेत्याच्या वडिलांना कोरोनाची बाधा


विटा, प्रतिनिधी
           साळशिंगे रस्त्यावरील आयटीआय कॉलेज परिसरात राहणाऱ्या एका 65 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आज त्याचे रिपोर्ट  पॉझिटिव्ह आले. ही  व्यक्ती  विटा शहरातील एका भाजीविक्रेत्याचे वडील असल्याचे सांगण्यात येत आहे.
          विटा शहरात आज दुपारी दोन महिलांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती.  त्यानंतर आता सायंकाळी एका भाजी विक्रेत्याच्या 65 वर्षीय वडिलांना कोरोना ची  बाधा झाल्याचे समोर आले आहे.  हा व्यक्ती  विटा शहरातील एका भाजीविक्रेत्यांचे वडील आहेत. हा भाजीविक्रेता विटा शहरासह अनेक गावांमधून भाजी विक्रीसाठी जात होता. त्यामुळे या वृध्दास नेमकी कोणामुळे कोरोनाची लागण झाली याची तपासणी केली जात आहे.  आज एकाच दिवशी विटा शहरात तिघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यावृध्दावर सध्या मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments