Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कुपवाड मध्ये आज दोन कोरोना पॉझीटीव्ह....


कुपवाड
आज रोजी कुपवाड हद्दीमधील कापसे प्लॉट मधील ५० वर्षीय महिला व १५ वर्षीय मुलगा राहणार कापसे प्लॉट कुपवाड यांना त्रास होत असल्याने त्याची स्वाब टेस्ट केली असता त्याचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार कुपवाड मधील महिलेला त्रास होऊ लागल्याने तिचा स्वाब दिनांक १७/०७/२०२० रोजी घेण्यात आलेला होता. त्यांचा अहवाल आज दि १८/०७/२०२० रोजी प्राप्त झालेने तो अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मिरज सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

तसेच त्यांचे संपर्कात आलेले त्याच्या घरातील 2 व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवणेसाठी ताब्यात घेणेत आले आहे. सदर ठिकाणी सागली मिरज व कुपवाड मनपा यांचे उपायुक्त व मनपाचे वैद्यकीय अधिकारी येथे भेट दिलेली असून सदर ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र निर्माण करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

Post a comment

0 Comments