Daily Mahasatta

Daily Mahasatta

अपघातग्रस्त तरुणीच्या मदतीला विटेकर धावले...
: बहिणीचा जीव वाचवा म्हणून भावाची साद
: अवघ्या चार तासात  दोन  लाखांचा मदतनिधी जमा

विटा, प्रतिनिधी
               शहरातील एका सामान्य कुटुंबातील तरुणी कामानिमित्त औरंगाबादला जाते... दुर्दैवाने त्याठिकाणी तिला मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागते.. तब्बल 28 दिवस कोमात आणि अकरा लाखाचा खर्च... अजूनही 11 लाखांचा खर्च होणार....परिस्थिती बेताची असल्याने हतबल झालेला भाऊ अखेर सोशल मीडियातून विटेकरांना बहिणीचा जीव वाचवण्यासाठी मदतीची साद देतो... आणि अवघ्या काही तासात 2 लाखांचा मदतनिधी जमा होतो...सोशल मीडियातील या माणुसकीच्या दर्शनाचे शहरात सध्या मोठे कौतुक होत आहे...पण मदतीचा आणखी मोठा टप्पा कसा पार होणार.. याची देखील विटेकरांना उत्सुकता लागून आहे...
         विटा शहरातील  कुमारी ऐश्वर्या एस. सिंगे ही अतिशय हुशार व अभ्यासू विद्यार्थिनी असून तिने पुण्यातील नामांकित कॉलेजमधून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहे. 23 जून 2020 रोजी औरंगाबाद येथे कंपनीत कामावर जाताना तिचा मोठा अपघात झाला. गेली 28 दिवस ती कोमात आहे. तिच्यावर औरंगाबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत उपचारासाठी सुमारे 11 लाखांचा खर्च झाला आहे. तर पुढील उपचारासाठी तिला आणखी 11 लाखांची  गरज आहे. शहरातील एका सामान्य कुटुंबात ओढवलेला प्रसंग पाहून विट्याचे माजी उपनगराध्यक्ष किरण भाऊ तारळेकर आणि रोटरी क्लब यांनी  सर्वप्रथम या कुटुंबाला मदत करण्याचे आव्हान सोशल मीडियातून केले होते.
          तसेच अपघातग्रस्त कुमारी ऐश्वर्या हिचा भाऊ तेजस शिंगे याने आपल्या बहिणीला संकटातून वाचविण्यासाठी समस्त विटेकरांना  सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्त हाक दिली. तिला वाचवण्यासाठी चाललेली धडपड पाहून अनेकांचे डोळे पाणावले. त्यानंतर सुरू झाला दातृत्व विटेकर यांच्याकडून मदतीचा ओघ. होय..   विटेकरांना अभिमान वाटेल अशी मदत पीडित कुटुंबाकडे जमा होत आहे.    
         विटेकरांचे  दातृत्व
विट्याचे माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांनी लोकनेते हणमंतराव पाटील ट्रस्टच्या माध्यमातून तेजस शिंगे यांच्याकडे 25 हजाराचा मदतनिधी दिला तसेच रोटरी परिवार यांच्या कडून 25 हजार, विपुल तळेकर यांच्या अंगण ग्रुप कडून 10 हजार तर राजलक्ष्मी ग्रुपचे उद्योजक शंकर बुधवारी यांच्याकडून 11 हजार रुपयांची  तातडीची मदत तेजस शिंगे  यांच्याकडे सोपवण्यात आली.  तेजसच्या  बँक खात्यावर  मदतीचा ओघ सुरूच आहे. अवघ्या चार तासात सुमारे 4 लाखांचा मदतनीधि जमा झाला. परंतु या तरुणीला उपचाराकरता 20 ते 22 लाखांचा खर्च होणार असल्याने जास्तीत जास्त विटेकरांनी या कुटुंबाला मदतीचा हात द्यावा,   असे आवाहन किरणभाऊ  तारळेकर यांनी केले आहे.
**************************
मदतीसाठी संपर्क
      Phone pay : 9404662885
      Google pay: 9404662885

Post a Comment

0 Comments