
गर्भाशयातील फायब्रॉइड गाठीमुळे होणारे त्रास
१)पाळीच्या दरम्यान जास्त रक्तस्राव होणे .अंगावर रक्ताच्या गाठी जाणे परिणामअँनेमियाशकतो
२) दिवसाहुंनही अधिक पाळीच्य दरम्यान चा रक्तस्राव सुरू राहणे. पाळी येऊन गेल्यानंतर ही
३)पाळी होऊन गेल्यानंतर ही पाळीच्या मधल्या काळात स्पाँटींग अर्थात डाग पडणे वा रक्तस्त्राव होणे.
४)पाळीच्या वेळेस पोटात दुखणे
५)ओटीपोटात स्थूलता फुगीरपणा अथवा दाब देत असल्याची भावना जाणवणे ओटीपोटात दुखणे
६)वारंवार लघवीला लागणे पूर्ण लघवी झाली नसल्याची की भावना मनात जाणवणे
७)शौचास जोर लावावा लागणे बद्धकोष्ठतेचा त्रास होणे
८)शारीरिक संबंध ठेवताना पोटात दुखणे
९)वंध्यत्व - मुले होण्यात अडचणी निर्माण होणे
१०)वारंवार गर्भपात होणे
११)पाठ कंबर दुखी व पायात गोळे येणे
१२)क्वचित प्रसंगी फायब्रॉइड च्या गाठी मध्ये
डिजनरेशन अथवा कॅन्सरमध्ये परावर्तित होण्या प्रसंगी ओटीपोटात तीव्र वेदना होण्याचा त्रास होण्याचा संभव असतो.
कारणे :
१) वय 30 ते 40 वर्षे वयोगटात फायब्रॉइड च्या गाठी प्रामुख्याने आढळून येतात रजोनिवृत्ती (कायमची पाळी थांबल्यानंतर) फायब्रॉइड ची गाठ क्वचितच आढळून येते बऱ्याच वेळी ही गाठ आकुंचन देखील पाहते
२)अनुवंशिकता आई बहीण आजी यामध्येही गाठ असेल तरीदेखील गाठ होण्याची शक्यता जास्त असते
३)आफ्रोअमेरिकन वंशज स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त असते
४)स्थूलपणा वजन जास्त असल्यास इस्टोजिन व
प्रोजेस्टेराँन हे हार्मोन्स गाठ तयार होण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
प्रश्न -फायब्रॉइड ची गाठ असल्यास कोणत्या तपासण्या करतात ?
1) सोनोग्राफी
2) एम आर आय
3) रक्ततपासणी
4) लॅप्रोस्कोपी
प्रश्न -फायब्राँइडची गाठ असल्यास त्यावर उपचार उपलब्ध आहेत?
फायब्राँइडचीची गाठ असेल व कोणताही त्रास होत नसेल तसेच गाठ लहान असेल कित्येक वेळेला डॉक्टर काहीही न करण्याचा सल्ला देतात दर सहा महिन्याला / एक वर्षाने स्त्रीरोगतज्ञ कडे जाऊन तपासणी करून सर्व आलबेल आहे की नाही याची खात्री करून घ्यावी कित्येक स्त्रियांना आयुष्यभर काही त्रास होत नाही त्याला वैद्यकीय भाषेत वाँचफुल एक्सपेटणसी म्हणतात.
२) औषधांनी उपचारGnRH agonist ची इंजेक्शन progestin IUD (intra utenne device) tranexamic acid miteprivtone यासारखी काही औषधे उपलब्ध आहेत.
३) MRI guided focused ultrasound surgery MRI च्या मार्गदर्शनाखाली अल्ट्रासोनिक ऊर्जा फायब्रॉइड च्या गाठी वर उपचार करण्यासाठी वापरता येते हा मोठा खर्चिक उपचार आहे
4)युटराईन आर्टरी एम्बोलायझेशन गर्भपिशवीला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी लावून ॲम्बुलन्स चा रक्त पुरवठा कमी करणे रेडिओ फ्रिक्वेन्सी ऑब्लेशन हादेखील एक ऑप्शन नवीन तंत्रज्ञानात आहे हा देखील खर्चिक उपचार आहे
५)ऑपरेशन लॅप्रोस्कोपी / हिस्टेरोस्कोपी टाकायची ओपन शस्त्रक्रिया / मायेमेटोमी थायराइड ची गाठ काढण्याच्या शस्त्रक्रियेला मायेमेक्टोमी म्हणतात
गर्भपिशवीचा आपल्या थराला छोटी गाठ असेल तर तो पाँलिप या प्रकारात मोडतो ती काढण्याची शस्त्रक्रिया पोलिपेक्टमी या प्रकारात मोडते या शास्त्रीय ओपन टाक्याच्या किंवा बिनटाक्याच्या दुर्बिणीद्वारे लँप्रोस्कोपी/ हिसेटोस्कोपी या शस्त्रक्रियांच्या आधारे करता येतात. बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया मध्ये वेदना कमी लवकर रिकवरी पोटावर वर्ण न राहणे हे फायदे आहेत.
ज्या स्त्रियांना गर्भधारणा व्हायचे आहे त्यांनी वरील गर्भपिशवी टिकवून ठेवणारे पर्याय निवडावेत यांचे कुटुंब पूर्ण झाले आहे व गर्भपिशवीच्या गाठी मुळे त्रास होऊ होत आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भपिशवी काढून घेण्याचा निर्णय घेण्यास हरकत नाही.( एकूनच गर्भपिशवीच्या गाठीशी गाठ पडल्यानंतर घाबरण्याचे मुळीच कारण नाही स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला व योग्य उपचार तुमच्या मनातील काळजीची ही गाठ सहजपणे सोडतील.
-डॉ. हेमंत शिंत्रे
सांगली
0 Comments