Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडच्या उपाध्ये गर्ल्स हायस्कूलचे सुयश - बारावीचा निकाल 98%.

 कुपवाड ता. 19
    नव महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित सौ. आशालता आ. उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, कुपवाड शाळेचा उच्च माध्यमिक वाणिज्य विभाग इ. 12 वी  चा निकाल 98 % इतका लागला आहे
      यामध्ये शाळेच्या विद्यार्थीनी कु. कुंभार सारिका कल्लाप्पा हि 83.84% गुण प्राप्त करत शाळेमध्ये प्रथम क्रमांकासह उत्तीर्ण झाली, तसेच कु. कुंभार समर्था सुनील 76.30% गुण  मिळवून द्वितीय,  तर कु. यादव सोनी बॅलिस्टर 74.61% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला. शाळेचा निकाल अव्वल राहिला आहे. शाळेच्या या घवघवीत यशामध्ये शाळेचे शिक्षक वृंद व त्यांनी केलेले अथक परिश्रम याचे योगदान मोलाचे आहे. 
    याबद्दल  संस्थाचालक, शाळा, शिक्षक, विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. शाळेने विद्यार्थीनींना संगणक, ई- लर्निग, प्रसिध्द व्याख्याते यांचे  व्याख्यान, विविध मार्गदर्शनपर कार्यक्रम शाळेमध्ये राबवून त्यांना विविध सोयी उपलब्ध करून देवून विद्यार्थीनींचा सर्वांगिण विकास करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून, शाळा उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
विद्यार्थीनींच्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. आण्णासाहेब उपाध्ये सर, संचालक श्री. सुरज उपाध्ये, संचालिका  कांचन उपाध्ये यांचे प्रोत्साहन तर मा. मुख्याध्यापक बिरनाळे सर, पर्यवेक्षक चिरमे सर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे  मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थीनींचे कुपवाड परीसरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments