Daily Mahasatta

Daily Mahasatta

राष्ट्रवादीचा शिवसेनेला दे धक्कासांगली प्रतिनिधी
अहमदनगरच्या पारनेरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याचं प्रकरण अलीकडेच निवळलं असताना सिन्नरमध्येही त्याची पुनरावृत्ती झाली आहे. राष्ट्रवादी आमदार माणिकराव कोकाटेच्या मदतीनं शिवसेनेचे बंडखोर उमेदवार सिन्नर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी निवडून आले आहेत. कोकाटे यांच्या १० समर्थक नगरसेवकांसह शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी ऐनवेळी बंडखोरी केली आहे.
     पारनेरच्या घटनेने शिवसेना आणि राष्ट्रवादीत बेबनाव(Shivena-NCP) असल्याचं समोर आलं, त्यानंतर महाविकास आघाडीत काही आलबेल नसल्याची टीका विरोधकांकडून होऊ लागली. त्यानंतर या नाट्यावर पडदा टाकत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत पाठवण्यात आले, त्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादीत यांच्यातील वाद मिटला. पण आता सिन्नर नगरपरिषदेच्या घटनेने पुन्हा एकदा दोन्ही पक्षात संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. (Shivena-NCP)
       सिन्नर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेकडून प्रणाली गोळेसर यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब उगले यांनी बंडखोरी करत उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला. नगरपरिषदेत नगराध्यक्षासह शिवसेनेचे १९ नगरसेवक असतानाही उपनगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला पराभव पत्करावा लागला आहे. या(Shivena-NCP) निवडणुकीत बंडखोर उमेदवार बाळासाहेब उगले यांना १५ मते मिळाली तर तर शिवसेना उमेदवार प्रणाली गोळेसर यांना १४ मते मिळाली.
        राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या १० समर्थक नगरसेवकांनी या निवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब उगले यांना मतदान केले, त्यासोबत ऐन निवडणुकीत शिवसेनेचे ५ नगरसेवकांनी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध मतदान केले, त्यामुळे बाळासाहेब उगले हे उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले. शिवसेनेने पक्षाच्या नगरसेवकांना प्रणाली गोळेसर यांना मतदान करण्यासाठी(Shivena-NCP) व्हीप बजावला होता. परंतु काहींनी बंडखोरी करत पक्षाच्या विरोधात मतदान केल्यानं त्यांच्याविरोधात कारवाई करु अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे गटनेते हेमंत वाजे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments