Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात माजी आमदारांचे निधन


जत, प्रतिनिधी
        जतचे माजी आमदार मधुकर कांबळे वय 55 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सन 1995 मध्ये जत विधानसभा मतदारसंघातून मधुकर कांबळे अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते.
        वयाच्या 29 व्या वर्षी दिग्गज विरोधक असलेल्या उमाजी सनमडीकर यांना पराभूत करून त्यांनी आमदारकी पटकावली होती. अत्यंत गरीब परिस्थिती असताना देखील त्यांनी विधानसभेत मिळवलेला विजय त्याकाळी राज्यभरात चर्चेत आला होता.  त्यावेळी जिल्ह्यातून निवडून आलेल्या पाचही आमदारांनी तत्कालीन युती शासनाला पाठिंबा दिला. त्यामध्ये टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजना सुरू करून दुष्काळी भागातील शेतीचा पाणी प्रश्न सोडवण्याची शासनाकडे आग्रही मागणी केली होती. या मागणीनुसारच त्यानंतर दुष्काळी भागातील उपसा सिंचन योजनाना गती मिळाली होती.
        आज  अल्पशा आजाराने माजी आमदार कांबळे यांचे  निधन झाल्याची बातमी समजताच जतसह सांगली जिल्ह्यातील  दुष्काळी भागात  शोककळा पसरली  आहे. 

Post a Comment

0 Comments