Daily Mahasatta

Daily Mahasatta

खानापूर तालुक्यात आणखी एक कोरोना पाॅझीटीव्हतालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा: 43
विटा, प्रतिनिधी
           खानापूर तालुक्यातील साळशिंगे येतील एका तरुणाचा कोरोना  अहवाल पाॅझीटीव्ह  आला आहे. हा तरुण मुंबईहून साळशिंगेला आलेला होता. या रुग्णा मुळे तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 43 वर पोहोचला आहे.
       याबाबत अधिक माहिती अशी मुंबईतील वास्तव्यास असलेला आणि मुळचा साळशिंगे ता. खानापूर येथील रहिवासी असलेला तरुण 22 तारखेला मुंबईहून कराड येथे आला होता. हा तरुण मुंबईतून आल्यानंतर 16 जुलै ते 19 जुलै या दरम्यान कराड येथील नातेवाईकाकडे वास्तव्यास होता. त्यानंतर प्रकृती बिघडल्यामुळे तो साळशिंगे या मूळ गावी आला.  त्याला कोरोना  सदृश्य लक्षण आढळून आल्यामुळे मिरज येथील  रुग्णालयात 22 रोजी उपचारासाठी पाठवले पाठवले होते.   त्याचा कोरोना  अहवाल  पाॅझीटीव्ह  आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 43 होती पोहोचला आहे.

Post a Comment

0 Comments