विटा हायस्कूलचा यशराज कदम 99.40 टक्के गुणासह प्रथम

प्रथम क्रमांक : यशराज प्रमोद कदम (99.40 टक्के)
द्वितीय क्रमांक : सिमरन रणजीत  कणसे (98. 80 टक्के  ) 
तृतीय क्रमांक : जानवी सचिन पतंगे (97. 80 टक्के)

विटा, प्रतिनिधी
      महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून दहावीच्या या परीक्षेत खानापूर तालुक्यातील विटा हायस्कूल विटा या शाळेने उज्वल यश संपादन केले आहे. शाळेतील यशराज प्रमोद कदम या विद्यार्थ्याने 99.4 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे
          विटा शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या विटा हायस्कुल विटा या शाळेने आपली अनेक वर्षांची यशाची परंपरा कायम राखली आहे. आज शाळेचा दहावीचा निकाल 96.18 टक्के इतका लागला.गुणानुक्रमानुसार निकाल पुढील प्रमाणे :
प्रथम क्रमांक : यशराज प्रमोद कदम (99.40 टक्के) द्वितीय क्रमांक : सिमरन रणजीत कणसे (98. 80 टक्के  ) तृतीय क्रमांक : जानवी सचिन पतंगे (97. 80 टक्के) चतुर्थ क्रमांक :  साईप्रसाद दत्तात्रेय चार्हाटे  (97.60)  पाचवा क्रमांक :  श्रेया रमेश देसाई (97.60 टक्के) सहावा क्रमांक : सानिका लक्ष्मण निकम 97% आणि सातवा क्रमांक: ऋत्विजा सिद्राम मुळीक 97% यांनी यश मिळवले आहे.
             प्रभारी प्राचार्य एस.एम. बोडके, माजी प्राचार्य अजित माळी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अॅड.सुमित गायकवाड, दिलीप शितोळे यांनी यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a comment

0 Comments