Daily Mahasatta

Daily Mahasatta

न्यू इंग्लिश स्कूल वाळूजचा ऋषिकेश महाडिक 97.80 गुणासह प्रथम


 विटा प्रतिनिधी
      इंदिरा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, वाळूज ता. खानापूर जि.सांगली या विद्यालयाचा एस.एस.सी परीक्षा मार्च 2020 चा निकाल 100% इतका लागला असून प्रथम पाच क्रमांकाचे विद्यार्थी पुढील प्रमाणे...
1) महाडिक ऋषिकेश राजाराम -97.80 %
2) कु.शिंदे साक्षी विनोद-94.40 %
3) देवकर ओम शांताराम-94.20 %
4) करडे संकेत अनिल-89.20 %
5) पाटील नीरज चंद्रकांत- 88.80 %
       परीक्षेला प्रविष्ट झालेल्या 45 विद्यार्थ्यांपैकी 22 विशेष प्रावीण्य ,13प्रथम श्रेणी ,9 द्वितीय श्रेणी, 1पास श्रेणीत उत्तीर्ण झाले.
            वरील सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.रविंद्र (आण्णा) देशमुख,सचिव मा.प्रा. कृष्णराव देवकर,उपाध्यक्ष मा.विठोबा (काका) पाटील, कोषाध्यक्ष जनार्दन (आबा) बाबर,संचालक कालिदास (भाऊ )बाबर,  महाराष्ट्र राज्य  मुख्याध्यापक  महामंडळाचे अध्यक्ष मा.विजयसिंह गायकवाड, मा.सुशांत (भाऊ) देवकर, मुख्याध्यापक श्री.कुबेर वीर ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी  अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments