'आदर्श ' ची मयुरी कदम 95.20 टक्केसह प्रथम: सलग 19 वर्षे 100 टक्के निकाल असणारी कोल्हापूर विभागातील एकमेव शाळा

विटा, प्रतिनिधी
          येथील लोकनेते मा. हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श माध्यमिक विद्यामंदिर या शाळेचा 10 वी बोर्ड परिक्षेचा निकाल सलग 19 व्या वर्षी 100 टक्के लागला असून असे यश मिळवणारी कोल्हापूर विभागातील ही एकमेव शाळा ठरली आहे. या यशाबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे संस्थेचे संस्थापक माजी आमदार सदाशिवरा (भाऊ) पाटील ,अध्यक्ष वैभव (दादा )पाटील , कार्यकारी संचालक श्री. पी. टी. पाटील व मुख्याध्यापक श्री.सुभाष धनवडे यांनी हार्दिक अभिनंदन केले.
   विद्यालयातील 40 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी 9 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, 75टक्के ते 90 टक्के दरम्यान 23 विद्यार्थ्यांना गुण आहेत तर 70 टक्के ते 75 टक्के पर्यंत 8 विद्यार्थ्यांनी गुण संपादन केले आहेत, विद्यालयातील प्रथम 3 क्रमांक पुढीलप्रमाणे
1)कु.मयुरी शंकर कदम 95.20 टक्के
2) कु..समृध्दी संतोष इनामदार 94.80टक्के
3) सूरज नंदकुमार साळुंखे 92.20 टक्के
   विद्यालयाने यापूर्वीही स्कॉलरशिप, एन.टी.एस. व एन.एन. एम.एस.परीक्षेत आपली गुणवत्ता दाखवली आहे या यशाबद्दल सर्व पालक व विद्यार्थी यांचेकडून समाधान व्यक्त होत आहे.

चौकट
         यशाचे श्रेय टीम वर्कला
     आदर्श माध्यमिक विद्यालय ने गेल्या सलग 19 वर्ष शंभर टक्के दहावीत दहावीच्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची पायाभरणी पाचवी पासूनच करायची आणि नववी दहावीच्या वर्गात गेल्यानंतर त्यांच्यावर आणखी लक्ष केंद्रित करायचे शाळेचे संस्थाचालक माजी आमदार एडवोकेट सदस्य भाऊ पाटील सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थी आणि पालक अश्या सर्वच सर्वांनी एकत्रितपणे केलेल्या परिश्रमामुळे सलग 19 वर्ष शंभर टक्के निकाल रक्ताला हे श्रेय या यशाचे श्रेय संपूर्ण आदर्श च्या संपूर्ण टीम वर्क ला द्यावे लागेल.
  
     सुभाष धनवडे, मुख्याध्यापक,
    आदर्श माध्यमिक विद्यामंदीर, विटा .

Post a comment

0 Comments