Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा : पहा.. 44 जणांचे स्वॅब रिपोर्टविटा, प्रतिनिधी   
        विटा   शहरासह तालुक्यातील तालुक्यातील
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या  संपर्कात आलेल्या 44 जणांचे रिपोर्ट आले असून हे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह असल्यामुळे विटा शहरासह तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
        खानापूर तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण होते. मात्र आज विटा शहरातील 16 रुग्णां सह एकूण तालुक्यातील एकूण   44 जणांचे रिपोर्ट  निगेटिव्ह आल्यामुळे तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून   विटा, साळशिंगे, बलवडी, जाधववाडी, हिवरे, जखिनवाडी आणि परिसरात कोरोनाचे रुग्ण सापडत होते. तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा  एकूण आकडा 43 पर्यंत जाऊन पोहोचल्यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण होते. कोरोना पाॅझीटीव्ह रुग्ण   आढळलेल्या गावातून एकूण 44 स्वॅब टेस्ट चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये विटा- 16 बेनापूर -1 सुलतानगादे-2, भिवघाट-4 हिवरे-1 मोही-1 शेडगेवाडी-2 पोसेवाडी-2 जाधव वाडी-2 ऐनवाडी-1 बलवडी-1, देवनगर-9, घोटी बुद्रुक-2 असे तालुक्यातील एकूण 44 संशयितांचे कोरोना चाचणी अहवाल  होते मात्र हे सर्व 44 अहवाल  निगेटिव आल्यामुळे खानापूर तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments