सांगली हादरली : 166 पाॅझीटीव्हसांगली, प्रतिनिधी        सांगली जिल्ह्यात आज शुक्रवारी रुग्ण संख्येने उच्चांक गाठला असून एकाच दिवसात 166  रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्हा हादरुन गेला आहे.           सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत 70 ते  जास्तीत जास्त  106 पर्यंत रुग्णांची वाढ झाली होती. मात्र आज   शुक्रवारी दिवसभरात 166 इतक्या प्रचंड प्रमाणात रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील 117 रुग्णाचा समावेश आहे त्यामध्ये सांगली शहरातील 74 तर मिरज शहरातील 43 रुग्णांचा समावेश आहे. एकट्या महापालिका क्षेत्रातच 117 रुग्ण आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्याचप्रमाणे आटपाडी- 1 जत-3 कवठेमंकाळ-18  खानापूर -1 मिरज तालुका 4 पलूस- 5 शिराळा -12 ,तासगाव -2,वाळवा -3, असे सांगली जिल्ह्यातील एकूण 166 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे कोरणा ग्रस्तांच्या एकूण आकडा आता 1450 वर पोहोचला असून आत्तापर्यंत 713 रुग्णांनी करणार मात केली असून 693 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Post a comment

0 Comments