: धनश्री बबन निकम -95.20 (प्रथम क्रमांक),
: रोहित रमेश शिंदे- 93.80 (द्वितीय क्रमांक )
: ऋतुजा अनिल पवार -92.80 (तृतीय क्रमांक)
विटा, प्रतिनिधी
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या स्वर्गीय किशाबापू कोंडोपंत गुळवणी माध्यमिक विद्यालयाने सलग तिसऱ्या वर्षी दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत यशाची हॅट्ट्रिक नोंदवली आहे. विद्यालयातील धनश्री बबन निकम या विद्यार्थिनीने 95.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, विटा येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या स्वर्गीय किशाबापू कोंडोपंत गुळवणी माध्यमिक विद्यालयाने दहावीच्या परीक्षेतील यशाची परंपरा कायम राखली आहे. यावेळी देखील दहावीच्या परीक्षेत 100% यश मिळवले आहे. यामध्ये धनश्री बबन निकम -95.20 (प्रथम क्रमांक), रोहित रमेश शिंदे- 93.80 (द्वितीय क्रमांक )आणि ऋतुजा अनिल पवार -92.80 (तृतीय क्रमांक) पटकावला आहे.
तसेच विद्या पोपट जाधव (91.80), तृप्ती महेश रोकडे (91.80), ऋतुजा सतीश महाडिक( 91. 60) करण किशोर साळुंखे (90.20) ,साक्षी सुरेश यादव (90) , सार्थक विठ्ठल नायकुडे (89.80,) गायत्री पंडित सुतार ( 89.20 ) या गुणवंत विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.
संस्थेचे मार्गदर्शक आमदार अनिलभाऊ बाबर, अध्यक्ष विनोद गुळवणी, उपाध्यक्ष सुधाकरशेठ शहा, सचिव मेघाताई गुळवणी, विश्राम गुळवणी, सुरेश पाटील, डि.के. कदम, विनय गुळवणी आणि मुख्याध्यापक डी. पी. कुलकर्णी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments