विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार

: सचिन पाटील रा. वायफळे, ता. तासगाव याच्या विरोधात इस्लामपूरात गुन्हा दाखल

इस्लामपूर, ( सूर्यकांत शिंदे )
     लग्नाचे आमिष दाखवून एका विवाहित महिलेची फसवणूक करत तिच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या  वायफळे (ता. तासगाव) येथील सचिन शिवाजी पाटील (वय २८) याच्यावर आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहित महिलेने याबाबतची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी  इस्लामपूर येथील न्यायालयात त्याने अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता तो फेटाळण्यात आला आहे.
    विवाहित असल्याचे माहिती असूनही सचिन पाटीलने या महिलेशी प्रेम असल्याचे सांगून जवळीक साधली. तू तुझ्या नवरा, मुलांना सोड, मी तुझ्याशी लग्न करतो, चांगला सांभाळ करतो, असे आमिष दाखवत तासगाव येथे स्टँडवर बोलावून अंबरनाथ, ठाणे येथे नेऊन लग्नाचे नाटक केले. तिच्याकडून मूल हवे असल्याचे सांगून जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. त्याने कोणाला सांगितलेस तर  हातपाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे  महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सचिन पाटील याने आज  इस्लामपूरच्या न्यायालयात जामीनसाठी अर्ज दाखल केला होता तो न्यायालयाने फेटाळला आहे. सरकारी वकील रणजित पाटील यांनी युक्तिवाद केला. 


 

Post a comment

0 Comments