राहुल गांधी यांना धक्काबुक्की, सांगलीत मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली टायर पेटवून भाजप सरकारचा निषेध

सांगली - नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली टायर पेटवून भाजप सरकारचा निषेध
करण्यात आला .
  
सांगली (प्रतिनिधी) 
    उत्तर प्रदेशातील हथरसा येथील बलात्कार पिडीतेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी  पायी जाणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ आज सांगली मध्ये नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली  युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायरी जाळून उत्तर प्रदेश सरकार आणि मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
           उत्तर प्रदेशात बलात्कार पिडीतेच्या कुटुंबियांना भेटायला निघालेल्या काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांना धक्काबुक्की झाल्याचे समजताच त्याचे पडसाद देशभरात उमटले. सांगली जिल्ह्यात देखील ठिकाणी निदर्शने करुन उत्तर प्रदेश आणि मोदी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. सांगली येथील काँग्रेस भवन समोर युवा नेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर टायर जाळून उत्तर प्रदेश सरकार आणि मोदी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
          काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये ताब्यात घेण्याच्या घटनेचा मी  तीव्र शब्दात निषेध करतो. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांना झालेली धक्काबुक्की म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या दडपशाहीचा लाजिरवाणा प्रकार  आहे. याचा आम्ही निषेध करतो असे  युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी म्हंटले आहे. या घटनेचा पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्य मंत्री विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. 
 

Post a comment

0 Comments