विट्यातील शिवप्रताप ॲग्रोमाॅल शेतकर्यांना दीपस्तंभ ठरेल : मंत्री विश्वजीत कदम

विटा : शिवप्रताप अॅग्रोमॉलचे उद्घाटन करताना कृषी राज्य मंत्री डाॅ. विश्वजीत कदम. यावेळी आ. अनिलभाऊ बाबर, आ. मोहनराव कदम, कृषी संचालक दिलीप झेंडे, प्रतापरावशेठ साळुंखे, विठ्ठल साळुंखे उपस्थित होते.

विटा ( मनोज देवकर)
    शिवप्रताप ॲग्रोटेक मॉल हा शेतकऱ्यांना दिपस्तंभ ठरणार आहे. शिवप्रताप उद्योगसमूहाने योग्य वेळी हे व्यासपीठ मिळवून दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्व आधुनिक अवजारे, आधुनिक तंत्रज्ञान, खते बी-बियाणे, औषधे उपलब्ध झाले आहेत, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी व सहकार राज्य मंत्री विश्वजीत कदम यांनी केले.
    विटा येथील ' शिवप्रताप ॲग्रोटेक मॉल” चे उद्घाटन मंत्री डॉ. विश्वजीत कदम, मा. आम. अनिल भाऊ बाबर, आमदार मा. मोहनराव (शेठ) दादा, मा. दिलीप झेंडे संचालक कृषी विभाग यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना मंत्री विश्वजीत कदम यांनी शेतकऱ्यांनी आता पारंपारिक पद्धतीने शेती करण्याचे सोडून आधुनिक शेतीकडे वळावे. भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. परंतु हीच शेती आपण व्यावसायिक पद्धतीने केली पाहिजे. आहे त्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न काढले पाहिजे. आधुनिक औजारे आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देणारा शिवप्रताप अॅग्रोमाॅल शेतकर्यांना दीपस्तंभ ठरेल असा विश्वास मंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.
    आ. अनिल भाऊ बाबर म्हणाले, आपल्या भागात टेंभू योजनेमुळे बहुतांश क्षेत्र ओलिताखाली येत आहे. शेतकऱ्यांनी आता पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे केले पाहिजे. ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे. शिवप्रताप ॲग्रोमॉल आपल्या शेतीसाठी लागणारे सर्व आधुनिक मशनरी तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहे. ठिबक सिंचनासाठी अर्थसहाय्य सह दर्जेदार कंपनीचे संच पुरवित आहे. मा. प्रतापराव शेठ दादांनी शेतकऱ्यांना एकाच छताखाली सर्व वस्तू मिळण्याचे दालन खुले करून दिले आहे. त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
    संस्थापक मा. प्रताप शेठ दादा म्हणाले, शिवप्रताप ॲग्रोटेक मॉल हा देशातील पहिला मॉल आहे, जो एकाच छताखाली सर्व शेतीचे साहित्य विक्री करतो. या मॉलमध्ये सात हजार पेक्षा जास्त वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत. विळी, खुरपी खोरे-कुदळी ते पेरणी, काढणे - मळणी पर्यंत सर्व मशिनरी त्याचबरोबर ठिबक इलेक्ट्रिक मोटर, पाईप लाईन, खते बी-बियाणे, औषधे, शेडनेट मल्चिंग पेपर सह इतर पॅकिंग साहित्य . जनावरांचे सर्व साहित्य उपलब्ध आहे. थोडक्यात शेतीसाठी ए टू झेड गोष्टींचे उत्तर या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे.
    विठ्ठलराव साळुंखे म्हणाले, शिवप्रताप ॲग्रोटेक मॉल हा शिवप्रताप शेतकरी उत्पादक कंपनीचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. जे जे साहित्य आधुनिक शेतीसाठी या पृथ्वीतलावर उपलब्ध आहेत ते ते साहित्य आमच्या शेतकऱ्यांसाठी इथे उपलब्ध करून देणे हे आमचे अंतिम उद्दिष्ट आहे. शिवप्रताप चा नावलौकिक शेतकऱ्यांची सेवा करून अधिक उंचावर नेऊ. केवळ वस्तू विक्री नव्हे तर विक्रीपश्चात सेवा बांधावर जाऊन दिली जाईल त्याचबरोबर शेतकऱ्यांना असणारे अनुदान, योजना, विमा योजना, बँक कर्ज यासाठी स्वतंत्र शेतकरी माहिती केंद्र सुरू केले आहे. त्याचाही उत्तम लाभ शेतकऱ्यांना करून देऊ, असा विश्वास चेअरमन विठ्ठलराव साळुंखे यांनी व्यक्त केला आहे.
    यावेळी डाॅ जितेश (भैय्या) कदम, मा. बसवराज मास्तोळी, (जिल्हा कृषि अधिकारी सांगली).मा. वैभव तांबे, (उपविभागीय कृषि अधिकारी सांगली मा. संतोष मोरे. (उपविभागीय दंडाधिकारी विभाग) खानापुर मा. ऋषिकेत शेळके,( तहसिलदार खानापुर) मा. डों. हणमंतराव कदम, (मानद संचालक, भारती विद्यापीठ, पुणे) मा. प्रकाश कुंभार, (तालुका कृषि अधिकारी, खानापुर ) मा. रामराव (दादा) पाटील परिसरातील शेतकरी व् कर्मचारी वृंद उपस्थित होते. महादेव घाडगे यांनी आभार मानले.


 

Post a comment

0 Comments