जतमध्ये चोरट्यांनी शाळेतील एलईडी व पोषक आहाराचे धान्य लंपास केले

जत (   सोमनिंग कोळी)

      जत शहरातील ताड वस्तीनजिक असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गावडे वस्ती येथील मराठी शाळा आणि अंगणवाडी चे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी  शाळेतील साहित्याची चोरी केली. हा प्रकार बुधवारी रात्री घडला. गुरुवारी सकाळी येथील काही लोकांना शाळेचे दरवाजे उघडे दिसल्यानंतर चोरी झाल्याचे समजले.
         अधिक माहिती अशी, शहरातील मंगळवेढा रस्त्यावर असणाऱ्या गावडे वस्ती येथे जिल्हा परिषदेची मराठी मुलांची शाळा व अंगणवाडी आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने शाळा बंदच आहे. बुधवारी रात्री शहर परिसरात पाऊस सुरू होता याचा फायदा अज्ञात चोरांनी घेतला. शाळेचे कुलूप तोडून आतील 32 इंची एलईडी, स्पीकर बॉक्स, भांडी, ताट, वाट्या ग्लास असे साहित्य चोरांनी लंपास केले आहे. तसेच अंगणवाडीतील प्लेट, ग्लास, पोषक आहाराचे धान्य चोराने नेले. याप्रकरणी जत पोलिसांनी चोरीची तक्रार दाखल केली आहे.
      घटनास्थळी जत पोलिसांनी पंचनामा केला आहे यावेळी पालिकेचे विरोधी पक्षनेते विजय ताड केंद्रप्रमुख जयवंत वळवी, शिक्षक नेते दीपक कोळी, मुख्याध्यापक सौ.येडेकर अंगणवाडी सेविका सौ.जहांगीर , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उत्तम शेठ चव्हाण उपस्थित होते. पोलिसांनी तातडीने या चोरांचा छडा लावावा अशी मागणी करण्यात आली आहे. मुलांचे शैक्षणिक साहित्य तसेच शालेय पोषण आहाराचे साहित्य चोरीस गेल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. 


 

Post a comment

0 Comments