सोनहिरा ९ लाख मे. टन ऊसाचे गाळप करणार : आमदार मोहनराव कदम

वांगी : सोनहिरा कारखान्याचा २१ वा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ प्रसंगी आ. मोहनराव कदम, कारखान्याचे संचालक व शेती कमिटीचे चेअरमन मा. श्री. रघुनाथराव कदम, संचालक निवृत्ती जगदाळे, प्रभाकर जाधव, युवराज कदम.
कडेगाव,  ( सचिन मोहिते  )
    वांगी (ता कडेगाव ) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचा सन २०२०- २१ या गळीत हंगामाचा २१ वा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ सोहळा कारखान्याचे चेअरमन मा. आम. वनश्री मोहनराव कदम यांचे शुभहस्ते आणि व्हा. चेअरमन मा. श्री. पोपटराव महिंद आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्मिता पोपटराव महिंद या उभयतांचे हस्ते  कोरोना सोशल डिस्टन्स ठेवून मास्क, सॅनिटायझर वापरून  साध्या पध्दतीने  संपन्न झाला.
          यानंतर कारखान्याचे चेअरमन मा. आम. वनश्री मोहनराव कदम म्हणाले की, गळीत हंगामाचेदृष्टीने कारखाना अंतर्गत इंजिनिअरींग, मिल, बॉयलींग हाऊस, उत्पादन विभाग, को-जन विभाग, डिस्टीलरी विभाग, केनयार्ड आणि संगणक इ. विभागातील सर्व यंत्रसामुग्री जोडणीची कामे पुर्णत्वास आलेली असून सर्व ऊस तोडणी व वाहतूक करार पूर्ण झालेले आहेत. आपल्या कारखान्याने आत्तापर्यंतचे झालेले सर्व गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडलेले असून देय ऊस बिले वेळेत दिलेली आहेत. कारखाना कार्यक्षेत्रामध्ये जादा प्रमाणात ऊस लागवडीचे क्षेत्र झालेमुळे कारखाना व्यवस्थापनाने या गळीत हंगामामध्ये अंदाजे ९ लाख मे. टनाचे वर गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. तेव्हा कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला नोंद केलेला ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन शेत कऱ्यांना केले .
        याप्रसंगी कारखान्याचे संचालक व शेती कमिटीचे चेअरमन मा. श्री. रघुनाथराव कदम, संचालक निवृत्ती जगदाळे, प्रभाकर जाधव, युवराज कदम, सयाजीराव धनवडे, बापूसो पाटील, दिलीपराव सुर्यवंशी, पुरुषोत्तम भोसले, अमोल पाटील, लक्ष्मण पोळ, तानाजीराव शिंदे, पंढरीनाथ घाडगे, जालिंदर महाडीक, शिवाजीराव काळेबाग तसेच सभासद, खातेप्रमुख, विभागप्रमुख आणि बॉयलींग हाऊस कर्मचारी इ. उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन, स्वागत व प्रास्ताविक को-जन मॅनेजर श्री. नवनाथ सपकाळ यांनी केले. 
 

Post a comment

0 Comments