विट्यात आज १३ कोरोना पॉझिटिव्ह

: खानापूर तालुक्यात आज २७ रुग्ण पॉझिटिव्ह
विटा ( मनोज देवकर )
       आज शुक्रवार ता.९ रोजी दिवसभरात खानापूर तालुक्यात २७ रुग्णांच्या कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. विटा शहरात १३ जण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. हिवरे, वासुंबे आणि भिकवडी या गावात प्रत्येकी तीन रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. लेंगरे मध्ये दोन , कार्वे , पोसेवाडी , बामणी या गावात प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
       कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या १३६२ वर पोहचली आहे. सद्या खानापूर तालुक्यात ५४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Post a comment

0 Comments