संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सांगली शहर अध्यक्षपदी ज्योती आदाटे

सांगली (प्रतिनिधी)
        पालकमंत्री जयंत पाटील यांच्या शिफारशीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा शहर उपाध्यक्षा व माजी नगरसेविका ज्योती आदाटे यांची महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या समितीवर सांगली शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. याबाबतचे पत्र नुकतेच मिळाले आहे.
         जिल्हाधिकारी डाॅ अभिजित यांनी सांगली शहर संजय गांधी निराधार योजनेच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर केल्या. यामध्ये माजी नगरसेविका ज्योती अदाटे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. तसेच भगवानदास केंगार, श्रीमती अनिता निकम, सुरेश बंडगर, आयेशा शेख, नितीन काळे, आशा पाटील, संतोष भोसले, बिपीन कदम आणि आप्पासो ढोले यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
...................................
महिलांचे प्रश्न सोडविणार...
        या निवडीसाठी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राहुल पवार, विधानसभा क्षेत्र शहर जिल्हाध्यक्ष कमलाकर पाटील, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष विनया पाठक यांचे सहकार्य लाभले. या समितीच्या माध्यमातून वंचित महिलांचे प्रश्न सोडविण्याची संधी मिळाली असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, अशी ग्वाही ज्योती आदाटे यांनी दिली आहे. 

Post a comment

0 Comments