आज पासून विटा शहरातील दुकानांच्या वेळेत बदल : अॅड वैभव पाटील

विटा (प्रतिनिधी)

       आज सोमवार ता.5 ऑक्टोबर पासून विटा शहरातील सर्व दुकानं आणि व्यवहार सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केले आहे.
      अॅड. वैभव पाटील म्हणाले, सर्व विटेकर नागरिक व व्यावसायिकांचे सर्वप्रथम मी धन्यवाद व्यक्त करु इच्छितो. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विट्यामध्ये मी आपणाला ज्या ज्या वेळी जनता कर्फ्यू किंवा वेळेच्या संदर्भामध्ये आवाहन केले त्या त्या वेळी आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे शहरात वाढणाऱ्या कोरोनाला रोखण्याचा आपला प्रयत्न यशस्वी ठरत आहे. अशीच एकी आपण पुढील काळामध्ये ही राखुया आणि येणाऱ्या संकटाचा मुकाबला करूया.
      सप्टेंबर महिन्यात 9 तारखेपासून 17 तारखेपर्यंत आपण जनता कर्फ्यू पाळला व त्यानंतर आपण सर्वांनीच ठरवले होते की सकाळी 9 वाजल्यापासून ते  सायंकाळी 5 वाजेपर्यंत विटा सुरू राहील याचे आपण सर्वांनीच पालन केले. आज पासून वेळेत बदल करून ही वेळ सायं 5 च्या ऐवजी सायं 7 वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे. मात्र 30 ऑक्टोंबर पर्यंत रविवारी जनता कर्फ्यू असेल आणि त्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे येणारी वेळ पाळून आपण  प्रशासनाला सहकार्य करूया, असे आवाहन ॲड वैभव  पाटील यांनी केले आहे. 


 

Post a comment

0 Comments