इस्लामपूरात कोरोनाच्या जनजागृतीसाठी बनविलेल्या पोस्टरचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्याहस्ते अनावरण

इस्लामपूर : व्यापारी महासंघाच्या वतीने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरच्या अनावरण प्रसंगी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, मोहन पाटील, शहाजी पाटील.

इस्लामपूर, ( सूर्यकांत शिंदे  )
      : कोरोनाच्या जागृतीसाठी व्यापारी बांधवांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. शहरातील व्यापारी वर्गाला पोलीस खात्याकडून लागेल ते सहकार्य उपलब्ध करुन दिले जाईल, अशी ग्वाही पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी येथे केले.
       इस्लामपूर व्यापारी महासंघाच्या वतीने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. रामलीला ट्रस्टच्या साई इंटरनॅशनल स्कुलमध्ये हा कार्यक्रम झाला.
        श्री. पिंगळे म्हणाले, "सर्व व्यापाऱ्यांनी मिळून एकत्र येणे, प्रश्न मांडणे यातून सर्वांना एका व्यासपीठावर येण्याची संधी मिळाली. त्यातून भरीव कामे होतात. कोरोना संसर्गाच्या काळात शहरातील व्यापारी समूहाने खूप मोठे सहकार्य केले. गरीब, उपेक्षित घटकासाठी निर्माण झालेल्या माणुसकीच्या नात्याच्या ग्रुपमध्येही बहुतांश व्यापाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला."
     श्री. जंगम यांनी प्रास्ताविक केले. व्यापारी महासंघाचे प्रमुख मोहन पाटील, रामलीला ट्रस्टचे शहाजी पाटील, नगरसेवक अमित ओसवाल, उमेश कुरळपकर, दीपक जाधव, केतन शहा, गौतम रायगांधी, विनायक जाधव, भूषण शहा, गौरव शहा, दिनेश पोरवाल, राजेंद्र शहा, मन्सूर वाठारकर, सागर जंगम, अमित शहा, दीपक कोठावळे, जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष दुष्यंत राजमाने उपस्थित होते. 

Post a comment

0 Comments