जत तालुक्यातील बोर नदी पात्रात बुडून युवकाचा मृत्यू

 

जत (  सोनलिंग कोळी )

तालुक्यातील सोनलगी येथे बोर नदी पात्रात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवार सकाळी घडली आहे. मानतेश विठ्ठल कांबळे (वय-१४) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
जत पूर्व भागातील बोर नदीपात्रात सध्या तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी खळखळून वाहत आहे. आज सकाळी मानतेश कांबळे याने अंघोळ करण्यासाठी आपल्या दोन मित्रांसोबत जवळच असणाऱ्या सोनलगी बोर नदी पात्राती पाण्यात गेला. मात्र पात्रात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झालाशआहे. महातेशचा मृतदेह अद्याप अजून सापडलेला नाही. सांगलीहून पाणबुडी टीम बोलावण्यात आली आहे. घटनास्थळी उमदी पोलीस पोलीस, ग्रामस्थ शोध घेत आहेत. परंतु बोर नदी पात्रात पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा शोध घेण्यास अडचणी येत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Post a comment

0 Comments