द्राक्ष व डाळिंब शेतीसाठी प्लास्टिक आच्छादन व शेडनेट साठी अनुदान द्या : आ.अनिल बाबर

 

विटा ( मनोज देवकर

    अवकाळी तसेच वादळी पावसामुळे राज्यातील द्राक्ष व डाळींब उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सद्या सांगली , सातारा , सोलापूर , नाशिकसह राज्यभरातील शेतकरी अस्मानी संकटामुळे आर्थिक अडचणींचा सामना करत आहे . अश्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे . यासाठी कमीतकमी नुकसान होईल अशी संरक्षक शेती करणे अत्यावश्यक झाले आहे . म्हणूनच फळबागांवरती प्लास्टिक आच्छादन व शेडनेट करून अतिवृष्टी व वादळवारे यामुळे होणारे नुकसान कमी करता येईल . या बाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावा . तसेच आच्छादन व शेडनेट साठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी मागणी खानापूर चे आमदार अनिल बाबर यांनी शासनाकडे केली. 
    सेंद्रिय उत्पादन प्रमाणीकरण यंत्रणा  , द्राक्ष व डाळींब शेतीसाठी प्लास्टिक आच्छादन देण्याबाबतच्या कार्यवाहीचा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला. राज्य सेंद्रिय उत्पादन प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करण्यासह प्लॅस्टिक आच्छादनाचे प्रायोगिक तत्वावर प्रकल्प सुरू  करण्याचे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. राज्य सरकार तसेच केंद्र सरकार कडून शेडनेट साठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले . या बैठकीला फलोत्पादन मंत्री संदिपान राव भुमरे , आ. अनिल भाऊ बाबर ,  श्री कैलास भोसले , संचालक द्राक्ष संशोधन केंद्र तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते .


Post a comment

0 Comments